मुदखेड तहसीलदार यांना लेखीनिवेदन देऊन सकल मराठा समाज मुदखेडच्या वतीने निषेध.
मुदखेड/ शहर प्रतिनिधी/ अतिक अहमद
दि.६रोजी मुदखेड तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालात मराठा आरक्षणा रद्द केल्यामुळे मुदखेड तहसीलदार यांना लेखीनिवेदन देऊन आपला निषेध व्यक्त केला.
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालात मराठा आरक्षण रद्द करण्यात आले. त्यामुळे सकल मराठा समाजाच्या मनात एक असंतोष निर्माण झाला आहे. त्याचेच पडसाद आज मुदखेड तालुक्यात दिसून आले. सकल मराठा समाजाच्या वतीने मुदखेड तहसीलदार यांना एक लेखी निवेदन देण्यात आले. त्यात सुप्रीम कोर्टाने मराठाआरक्षण साठीचा कालचा दिलेला निर्णय हा मराठा समाजासाठी अतिशय दुर्दैवी आहे. राज्य व केंद्र सरकारने हा विषय गांभीर्याने न घेतल्यामुळे आज मराठा समाजाला आरक्षण मिळू शकले नाही. त्यामुळे मराठा समाजाचे मोठे नुकसान झाले आहे.
राज्य व केंद्र सरकारने लवकरात लवकर मराठा आरक्षणाचा मार्ग मोकळा करावा नाहीतर मराठा समाज हा पुन्हा रस्त्यावर उतरेल. कोरोनाच्या या महामारी मुळे शांततेत केवळ निवेदन देत आहोत परंतु यापुढे राज्य सरकार व केंद्र सरकार यांच्या विरुद्ध तीव्र आंदोलने करण्यात येतील असा इशारा सकल मराठा समाज मुदखेड च्या वतीने यावेळी देण्यात आला.
या निवेदनावर शत्रुघ्न गंड्रस, गोपीराज पवार, पंजाबराव मुंगल, नामदेव शिंदे, शिवाजी वडजे, गंगाधर मगरे, विश्वंभर पवार, सुभाष मगरे, मारुती गाडे, गोविंद शिंदे, गोविंद गाडे, गणेश खानसोळे, अमोल अडकिने यांच्या स्वाक्षऱ्या आहेत



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा