बंगाल मधील हिंदूं वर होणाऱ्या अत्याचाराचा विश्व हिंदू परिषद नांदेड कडून निषेध

 दोषीवर कठोर कारवाई व राष्ट्रपती राजवट लागू करण्याची पंतप्रधानांकडे मागणी.

संपादक आशिष मुगटकर



नांदेड जिल्हा प्रतिनिधी

पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर मोठ्या प्रमाणात तेथील हिंदू समाजावर अत्याचार केला जात आहे हिंदू समाजातील लोकांची काही समाज विघातक लोकांकडून निर्घृण हत्या केल्या जात आहेत. महिलांवर अत्याचार करून त्यांनासुद्धा मारून टाकली जात आहे. हे सर्व चालू असताना सुद्धा तेथील सरकार डोळे बंद करून बसले आहे. अशा समाजविघातक लोकांना वेळीच आळा घातला गेला पाहिजे नाहीतर कित्येक हिंदूचा नरसंहार येणाऱ्या काळात होतील हे सरकारने लक्षात घेतले पाहिजे.

या प्रकरणात सहभागी असणाऱ्या सर्व आरोपींवर कारवाई करून तेथे राष्ट्रपती राजवट लागू करावी अन्यथा विश्व हिंदू परिषद कडून व बजरंग दल कडून मोठ्या प्रमाणावर आंदोलन केले जाईल असे निवेदनात म्हंटले आहे. सदरील निवेदन हे जिल्हाधिकारी नांदेड यांच्या मार्फत देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांना पाठवले आहे.

 या निवेदनावर शशिकांत पाटील, गणेश कोकुलवार,महेश देबडवार, कृष्णा इंगळे, अक्षय पाटील, पवन यादव, सचिन, गणेश फुलारी,गौरव,राम, चंद्रकांत धसकनवार, कृष्णा उदावंत, दामोपंथ गोस्वामी, चंदनसिंह चंदेल,आकाश कापकर, कृष्णा सिंग ठाकूर आदीच्या या निवेदनावर स्वाक्षर्‍या आहेत.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

लोकप्रिय बातम्या