- गावात तापीच्या रुग्णात मोठ्या संख्येने दिवसेनदिवस वाढ.
- गावातील लोकांची आरोग्य तपासणी करण्याची गरज.
मुगट / वार्ताहार
मुदखेड तालुक्यातील मुगट येथे गेल्या काही दिवसापासून गावात मोठ्या प्रमाणात ताप, सर्दी, जुलाब, खोकला यांच्या रुग्णांची संख्या गावात दिवसेंदिवस चांगलीच वाढत आहे. गावातील प्रत्येक दोन घराच्या नंतर एका घरातील व्यक्ती या तापीने बीमार असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे गावात सध्या तापीची साथ वाढत आहे. कोरोनाच्या भीतीमुळे गावातील लोक शासकीय दवाखान्यात न जाता खाजगी दवाखान्यात दाखवून तापीवर तात्पुरता इलाज केला जात आहे.
गावातील खाजगी दवाखान्यात रुग्ण धाव घेत आहेत. ताप, सर्दी, खोकला, जुलाब मुळे रुग्णांची मोठ्या प्रमाणात खाजगी दवाखान्यात गर्दी, गैरसोय व आर्थिक पिळवणूक केली जात आहे. तरी सुद्धा रुग्ण बरे होत नाही.
कोरोनाच्या भीतीमुळे रुग्ण शासकीय दवाखान्यात न जाता गावातच खाजगी दवाखान्यात उपचार करत आहेत. ताप ही लोकांची कायमस्वरूपी कमी होत नसल्यामुळे त्यांना या तापीमुळे जीव गमवावा लागत आहे. गावात तापआलेल्या व्यक्ती सुद्धा आपल्याला कोरोना झाला या भीतीमुळे अनेकांना हृदयविकाराच्या झटका येऊन जीव गमावला आहे.
गावात गेल्या २०दिवसात १०ते १५ लोकांचा मृत्यू ताप व हृदय विकाराच्या झटक्याने झाला आहे. गावात एवढे लोक मृत्युमुखी पडले आहेत व मृत्यू आकडा वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. मागच्या वर्षी कोरोना काळात गावातील लोकांच्या घरोघरी जाऊन आरोग्या तपासणी आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या सहकार्याने आरोग्य विभागाने केली होती . आता सुध्दा गावातील लोकांच्या हीता साठी,आरोग्यासाठी अशाच घरोघर तपासणी करण्याची अत्यावश्यक गरज आहे. यासाठी आरोग्य विभागाने पुढाकार घेवून गावातील अनेक लोकांची कोरोना चाचणी घेतली तर नक्कीच गावात कोरोनाचे रुग्ण निघण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही.
ग्रामपंचायत कडून गावात सेनिटायझर फवारणी तसेच गावकऱ्यांना ताप, सर्दी, जुलाब, खोकला झाल्यास शासकीय दवाखान्यात जाऊन उपचार घेण्याचे व कोरोणा चाचणी करण्याचे आवाहन डॉ.संजय कासराळीकर ,ग्रामविकास अधिकारी राजेश्वर भुरे यांनी केले आले.
गावातील लोकांच्या आरोग्यासाठी आरोग्य विभागाने या कडे तात्काळ लक्ष दिलेतर गावातील लोकांचे जीव जाण्यापासून वाचू शकतात.त्यामुळे आरोग्य विभागाने याकडे तात्काळ लक्ष देण्याची आवश्यकता आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा