नांदेड प्रतिनिधी( सरदार गुलाब सिंग)
नांदेड येथील शिख समाजाचे शिष्ट मंडळ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबई येथे भेट घेऊन भाटिया समितीच्या शिफारसी लागू न करता सचखंड गुरुद्वारा बोर्ड अधिनियम 1956 चा निर्णय कायम ठेवून अधिनियम कलम 11 ला रद्द करण्याची मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.
भाजपा खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या नेतृत्वाखाली गुरुद्वारा बोर्डाचे माजी सदस्य गुरमीत सिंग महाजन, मनप्रीत सिंग कुंजीवाले, भागेंद्र सिंग घडीराज यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान या शिष्टमंडळाने शिखसमाजाच्या भावना त्यांच्यासमोर मांडल्या त्यात त्यांनी भाटिया समितीच्या शिफारशी या स्थानिक शिख समाजासाठी अनुकूल नाहीत तसेच भाटिया समितीच्या शिफारशींच्या जागी सध्याच्या सचखंड गुरुद्वारा बोर्ड अधिनियम 1956 ला कायम ठेवत अधिनियमाची संशोधित कलम 11 ला रद्द करण्याची मागणी यावेळी शिष्टमंडळांनी उपमुख्यमंत्र्याकडे केली आहे. यावेळी या शिष्टमंडळाला उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या शिख समाजाच्या भावनांचा आदर करूनच सरकार योग्य तो निर्णय घेईल असे आश्वासन याप्रसंगी दिले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा