मुदखेड तालुका प्रतिनिधी
दि.२१ येथील भारतीय जनता पार्टी विश्वकर्मा योजनेची समिती जाहीर झाली असून,या समिती मार्फत मुदखेड तालुक्यातील बारा बलुतेदार समाजातील एक हजार कारागीराणा बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देऊन व्यवसायाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.या कर्ज योजनेचा लाभ प्रत्येक गावात पोहचवावा या करिता या समितीचे गठन करण्यात आले आहे.ही समिती तालुका स्थरीय असून, या समितीच्या ता.प्रमुख पदी शंकर मुतकलवाड तर सदस्य म्हणून संजय उर्फ पप्पू सोनटक्के, गोविंद उर्फ कानोबा बिसमिले,कृ.ऊ.बा.स. संचालक बालाजी तेलंगे,माधव मेटकर, गुलाब सूर्यवंशी,प्रभाकर पांचाळ यांचा समावेश आहे.
या निवडीचे पत्र जिल्हा संयोजक डॉक्टर प्रसाद डोंगरगावकर यांनी नांदेड लोकसभेचे लोकप्रिय खा.प्रताप पाटील चिखलीकर, आ.राम पाटील रातोळीकर,भाजपा जिल्हाध्यक्ष सुधाकरराव भोयर यांच्या नेतृत्वाखाली आणि भाजपा.मराठवाडा संघटन मंत्री संजय कौडगे,प्रदेश सचिव देविदास राठोड, जिल्हा महामंत्री प्रवीण गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली समाज माध्यमावर प्रसारित केले आहे.
या निवडी बद्दल तालुका अध्यक्ष बालाजी पाटील खटिंग, तालुका सरचिटणीस सुदाम पाटील खानसोळे, पुरुषोत्तम चांडक, तालुका सचिव निळकंठ हामंद आदींनी अभिनंदन केले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा