मुदखेड कांग्रेस कडून रेल्वे भुयारी मार्गाचे श्रेय लाटण्यासाठी मुदखेडच्या नागरिकांना धरले वेठीस.

 मुदखेड भाजपा कार्यकर्त्यांनी अटक व सुटका

संपादक आशिष मुगटकर


मुदखेड दि.५

शहरातील रेल्वे भुयारी मार्गाचे काम राजकीय महत्वकांक्षे पोटी गेल्या दिड दशका पासून रखडून पडला आहे. दिवसभरात ६१ वेळासाठी हा रेल्वे गेट पडत असल्याने वाहूकीस मोठा अडथळा निर्माण होऊन अनेकदा नागरिकांना जीवाशी मुकावे लागले तरी स्थानिक कांग्रेस कडून श्रेया लाटण्यासाठी नागरिकांना वेठीस धरले आहे.

अशा अनेक घटना पहाता रखडलेला भुयारी मार्ग नागरिकांना खुला करून देणे हाच एकमेव मार्ग आहे.सद्या दिवाळी सानानिमित्त तालुक्याचे ठिकाण असल्याने शहरात मोठी वरदळ वाढल्याने त्याचे अनेकदा गर्दीत रूपांतर होत आहे. याची दखल घेऊन भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा शहर शाखेच्या वतीने प्रशासनास सात दिवसाचा अल्टीमेटम देऊन कळविले होते की, दिवाळीच्या मुहूर्तावर मुदखेडच्या नागरिकांना भुयारी मार्ग सुरु करून द्यावा. अशा प्रकारची विनंती करून सुद्धा हा भुयारी मार्ग सुरु केला नाही. लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल असे सूचित केले होते.त्या प्रमाणे अल्टीमेटम मुदत संपल्यामुळे आठवडी बाजारी नागरिकांची रेल्वे गेट मुळे होणारी कुचंबाना थांबवावी हा उदात्त हेतू ठेऊन सनदशीर मार्गाने भुयारी मार्ग ओलांडून रस्ता खुला करत असतांना उद्घाटनजीवी मुदखेड काँग्रेसच्या शहरातील स्थानिक कार्यकर्त्यांनी भाजपा कार्यकर्त्यांना अडऊन धक्का बुक्की करत मोटर सायकली आडव्या पाडून जीवे मारण्याची धमकी दिली. 

या वेळी भाजपा कार्यकर्त्यांनी लोकशाही मार्गाने भुयारी मार्गांवर ठिय्या देऊन प्रशासनास चालुकरा-चालुकरा भुयारी मार्ग चालू करा!, होष में आओ-होष में आओ अशोक चव्हाण होष में आओ, भुयारी मार्ग आमच्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचा, भुयारी मार्ग खुला करू न देणाऱ्या काँग्रेसचा धिक्कार असो अस्या प्रकारच्या घोषणांनी भुयारी मार्ग परिसर अगदी दुमदुमून टाकला होता.

काँग्रेसनी भुयारी मार्ग सुरु करण्यापासून आडवीले तर पोलिसांनी भाजपा कार्यकर्त्यांना पोलीस गाडीत डांबून नेऊन गुन्हे दाखल करून रास्त मागणी रखडून ठेवली.त्यामुळे पुन्हा एकदा मुदखेड शहर काँग्रेस कडून शहरातील नागरिकांचा भुयारी रेल्वे  प्रश्न कायम ठेवत वेठीस धरले असून चोराला सोडून सन्याशास फाशी अस्या प्रकारची चर्चा सामान्य नागरिकांच्या तोंडून ऐकावयास मिळत होती.

या आंदोलनात भाजपा नांदेड उत्तर जिल्हा महामंत्री प्रवीण गायकवाड,जिल्हा सचिव भगवान पानेवार,ओबीसी आघाडी जिल्हा उपाध्यक्ष गोविंद गोपनपल्ले,कृषि उत्पन्न बाजार समिती संचालक सुरेश शेटे,शहराध्यक्ष पुरुषोत्तम चांडक,शिवसेना शहर प्रमुख सचिन माने,माजी अध्यक्ष संजय सोनटक्के, युवा मोर्चा शहराध्यक्ष गजानन कमळे,व्यापारी आघाडी ता.अध्यक्ष कानोबा बिषमिले,निळकंठ हामंद,पंचायतराज शहराध्यक्ष प्रभाकर पांचाळ, शहर सरचिटणीस अमोल अडकीने,सतीश मुंगल, मनोज कांबळे,प्रकाश सूर्यवंशी,स्वप्नील चंद्रे शेटीबा शिंदे,मारोती पानेवार यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

भाजपच्या प्रमुख कार्यकर्त्यांना अटक करून सुटका केल्याची माहिती असून सनदशीर लोकशाही मार्गाने रस्ता खुला करणाऱ्या कार्यकर्त्यांना धक्का बुक्की करून जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या कार्यकर्त्यावर पोलीस प्रशासन काय कार्यवाही करते की माजी मुख्यमंत्री यांच्या दबवास बळी पडून अभय देते या कडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

लोकप्रिय बातम्या