मुदखेड तालुका/ प्रतिनिधी
तालुक्यातील येथील मौजे वाई हे गावं मुदखेड -भोकर - उमरी या तीन तालुक्यांच्या सांगमावर वसलेले आहे.गेल्या अनेक दिवसांपासून विकास कामांपासून वंचित असलेले पण मुदखेड पासून अगदी जवळ आणि केवळ नऊ किलोमीटर वर असलेले गावं.राजकीय महत्वकांगसेतून हरवलेले. या गावास गेली अनेक वर्ष रस्त्याचा त्रास भोगावा लागला खरे,राज्यात भाजपाची सत्ता आली अन या गावावर पकड असलेले भाजपाचे तत्कालीन विधानसभा अध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी थेट माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच साकडे घालून मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून डोरली गेट ते थेट ढोल उमरी शिवे पर्यंत चा रस्ता मंजूर करुन घेतला आणि ३कोटी ६८ लक्ष रुपये निधीतून अगदी उत्कृष्ट रस्ता वाई वाशियांना मिळाला. याच बलबुत्यावर वरदडा तांडा आणि वाई या गावातील जनतेने ग्रामपंचायतीची सत्ता भाजपा प्रणित ग्रामविकास प्यानलाला एक हाती दिली.त्या नंतर या भागाच्या विकासाला खरी सुरवात झाली असे म्हटलेतर वावगे ठरणार नाही.
या अगोदर राष्ट्रीय पेयजल योजनेतून या गावास पाणि पुरवठ्याची महत्व कांगशी योजना मंजूर झाली होती खरी पण रुपये 48लक्ष एवढ्या किंमतीच्या पा. पु. योजनेचा तत्कालीन सरपंच व आश्रयदात्या प्रस्थापित राजकारण्यांनी या योजनेचा चुराडा केला. आज तागायत राष्ट्रीय पेयजल योजनेचे काम पूर्ण झाले नाही त्यामुळे ही योजना ग्रामपंचायतिकडे हस्तान्तरीत न झाल्याने या विषयात विद्यमान ग्रामपंचायतिच्या सत्ताधा र्यांना लोकांच्या निकडीच्या समस्येवर काम करणे त्रासदायक ठरले आहे.
विद्यमान सरपंच सौ. शोभा केशव पाटील ढगे यांच्या कुशल कर्तृत्वामुळे टंचाईच्या निधीतून जुन्या विहिरीचे पुनःर जीवन केल्याने वाईकरांच्या पिण्याच्या पाण्याच्या संकटावर काही प्रमाणात मात मिळवता आली आहे.
आ.राम पाटील रातोळीकर यांच्या स्थानिक विकास निधीतून पुरुष आणि महिलांना सार्वजनिक शोच्यालय बांधकाम पूर्ण झाले आहे. जनवारांच्या पिण्याच्या पाण्यासाठी गावाच्या दोन्ही दिशांना सार्वजनिक पाणवठे उभारण्यात आली आहेत. ग्रामपंचायत दुरुस्ती अंतर्गत संगणक कक्ष बांधण्यात आले आहे. जि.प. शाळा दुरुस्ती अंतर्गत डिजिटल सांगणकीय फळा बसवून डिजिटल शिक्षण प्रणालीचा वापर गोर गरिबांच्या मुलांकरिता सुरु करण्यात आला आहे. वर्ग खोल्या डिजिटल करुन, टाईल्स फर्शी, रंग रंगोटी साकरण्यात आली आहे.सर्वांना माफक दरात पिण्याचे शुद्ध पाणि मिळावे या हेतूने बौध्द वस्तीत स्वच्छ पिण्याच्या पाण्याचे ए.टी. एम.सयंत्र बसविण्यात आले आहे.
सत्ता काळातील दोन वर्ष कोरोना महामारीत गेली न गेली सद्या ग्रामपंचायतिने दलित वस्ती सुधार योजने अंतर्गत नुकतेच सिमेंट रस्त्याच्या कामास सुरवात केली आहे. कामाचा दर्जा उत्कृष्ट व्हावा या हेतूने कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर आज भाजपाचे मराठवाडा प्रभारी प्रवीण गायकवाड यांनी अचानक कामास भेट देऊन पाहणी करुन चालू असलेल्या कामाबद्दल समाधान व्यक्त करत काही महत्व पूर्ण सूचना केल्या.
या वेळी सरपंच प्रतिनिधी केशव पाटील ढगे, उपसरपंच प्रतिनिधी गंगाधर कसबे, सेवा स. सो. चे संचालक शंकरराव हनवते, शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष मारुती गायकवाड,माधव पाटील ढगे, विनायक एडके, भुजंग पाटील वडजे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा