निवघा,डोणगाव, वासरी या गावांत जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला केराची टोपली...!!
मुदखेड तालुका प्रतिनिधी
मुदखेड तालुक्यातील सेवा सहकारी संस्थेच्या निवडणुकीचा निकाल नुकताच लागला. त्यापुर्वी जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण दिवसेनदिवस वाढत असल्याने जिल्हाअधिकारी डॉ.विपीन इटनकर साहेब यांनी कोरोना नियमावली कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले.परंतु या नियमांचे काटेकोरपणे अंमलबजावणीचा विसर मुदखेडला पडला आहे.या नियमांचे पालन तालुक्यात कुठेच होत नाही. मुदखेड तालुक्यात हे नियम केवळ कागदावरच दिसत आहेत.
तालुक्यातील निवघा,डोणगाव,वासरी या गावात कोरोनाचे नियम पायदळी तुडवत सोसायटी विजय उत्सव मोठ्या संख्येने लोकांच्या उपस्थितीत साजरा केला. याचे फोटो सोशल मीडिया वर फिरत आहेत.यात मुदखेड तालुक्यातील मा.सभापती प्रतिनिधी व तालुका अध्यक्ष, पंचायत समिती सदस्य यांचा या फोटो मध्ये समावेश आहे.
एखाद्या पक्षाच्या जबाबदारी नेतेच जर बेजबाबदार पणे वागत असतील तर कार्यकर्ते, सामान्य माणसाने यांचा काय आदर्श घ्यावा.
याचेच परिणाम दोनच दिवसात दिसले जिल्ह्यात पहिला मुदखेडतालुका आहे ज्यात कोरोनाचे रुग्ण वाढले.
पालकमंत्री साहेबांनी या कडे विशेष लक्ष देवून येणाऱ्या काळात तरी अशा घटना घडु नयेत यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.
प्रत्येकाने कोरोनाच्या नियमांची अंमलबजावणी केली कोरोनाला रोखता येईल.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा