खतांचे वाढलेले दर कमी करुन शेतकऱ्यांना खते उपलब्ध करून द्या.

 -------------------------------------------------

केंद्रिय कृषि मंत्री नरेंद्रसिंह तोमर,केंद्रिय खते व रसायन मंत्री मनसुख मंडाविया यांना मुदखेड राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी.

----------------------संपादक आशिष मुगटकर----------------------------------



मुदखेड तालुका / प्रतिनिधी

    या वर्षी सर्वत्र चांगल्या पाऊसामुळे जिल्ह्यात पेरणी चांगली झाली आहे. गहू,ज्वारी,हरभरा,ऊस,केळी,पपई व फुलशेती या पिकांना खतांची आवश्यकता असते.अर्धापूर व मुदखेड तालुक्यात केळी,ऊस,पपई व फळबागा असल्याकारणानं खतांचा वापर शेतकऱ्यांना करावा लागतो पण खतांचे दर गेल्या तीन महीन्यात वाढून गगनाला भिडले आहेत.

  १०:२६:२६ या खतांचे दर खरीपात ११७५/-रूपये प्रति ५० कि ग्र एवढे होते ते १३५०/-ईतके झाले आणि सध्या १५००/-रूपये आहे.पोट्यश १०४०/- एवढे होते ते १३५०/- झाले आणि सध्या १७००/-रू.प्रति पोते झाले आहेत, गेल्या महिन्यापासून १०:२६:२६, १२:३२:१६ व १४:३५:१४ डिएपी,पोट्यश या खतांचा तुटवडा झाला आहे.

      ऐन हंगामात शेतकर्यांपूढे नवा गंभीर प्रश्न तयार झाल्यामुळें उत्पादन खर्च वाढण्याची समस्या तयार झाली आहे, सध्या तर डीएपी चा तर पुरवठाच होत नाही झालाच तर त्यासोबत ईतर खते लिंकिंग ने घेण्याची सक्ति केल्यामुळें शेतकर्यांना विनाकारण मोठा भुर्दंड भरावा लागत आहे.म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष शिवानंद पाटील शिप्परकर यांनी निवेदनाद्वारे तहसिलदार सुजित नरहरे यांच्यामार्फत केंद्रिय कृषि मंत्री तथा किसान कल्याणमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्यासह केंद्रिय खते व रसायन मंत्री मनसुख मंडाविया यांच्याकडे दर कमी करण्याची मागणी केली आहे.

यावेळी शहराध्यक्ष महंमद बुराण, तालुका उपाध्यक्ष प्रदीप पाटील ढगे,सोशियल मिडीया अध्यक्ष ऋषिकेश गोंदगे, हनमंत पाटील नटूरे,रामा गुंजकर, पद्माकर बोकेफोड,प्रशांत मुंगल,अंकुश मोरे,भगवान कल्याणे यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

लोकप्रिय बातम्या