नांदेड जिल्हा / प्रतिनिधी
अभ्यासपूर्ण, बहारदार,कार्यक्रमानुरुप सूत्रसंचालन करणे ही एक दुर्मिळ कला असून ती राज्य पुरस्कार प्राप्त बहुश्रुत शिक्षक राजेश कुलकर्णी यांनी पूर्णतः आत्मसात केली आहे,याचा मला शिक्षक आमदार म्हणून अभिमान वाटतो, असे गौरवउद् गार शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी कुलकर्णी यांच्या सत्कार प्रसंगी काढले. नुकतीच आमदार काळे यांनी गुणवत्तापूर्ण प्रशाला जि.प.हा.विष्णुपूरी येथे सदिच्छा भेट दिली.यासमयी त्यांच्या सोबत शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष साहेबराव हंबर्डे, प्रा.डी.बी.जांभरुनकर,डॉ विक्रम देशमुख,डॉ अशोक मोटे, प्रा.मजरोद्दीन,प्राचार्य शेटकार,यशवंत कांबळे व मुख्याध्यापक एन.एन.दिग्रसकर हे उपस्थित होते.
यावेळी अत्यंत अभ्यासपूर्ण, नेटके व बहारदार सूत्रसंचालनामुळे शिक्षक राजेश कुलकर्णी यांचा आमदार काळे यांनी उत्स्फूर्तपणे पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला आणि विशेष नोंद घेतली. सूत्रसंचालनाच्या माध्यमातून कुलकर्णी यांनी आमदार काळे यांचा जीवनपट व राजकीय कारकीर्द सुंदर काव्यातून आगळ्यावेगळ्या पध्दतीने सादर केल्यामुळे त्यांचा सन्मान करण्यात आला. यापूर्वीही अनेक कार्यक्रमाच्या उत्कृष्ट सूत्रसंचालनामुळे कुलकर्णी यांचा अधिकारी, पदाधिकारी व राजकीय व्यक्तिंच्यावतीने सन्मान व सत्कार करण्यात आला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा