मुगट ( वार्ताहर)
मुगट येथील ग्रामदैवत सद् गुरु संत श्री.आत्माराम महाराज यांचा जन्मोत्सव सोहळा मोठ्या हर्ष उल्हासात येथील बोधी मठात संपन्न झाला.
संस्थानचे मठाधिपती संत श्री.सिताराम महाराज यांच्या हस्ते सद् गुरु संत श्री आत्माराम महाराज यांच्या समाधी स्थळास दुग्ध अभिषेक , धार्मिक विधी संपन्न करण्यात आली. त्यानंतर सकाळी १०:३० वाजता ह.भ.प.भगवान महाराज राजेगोरे शेलगावकर यांचे कीर्तन झाले ठीक १२:०० वाजता भक्तांनी पुष्पवृष्टी करत सद्गुरु संत श्री आत्माराम महाराज यांच्या जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला.
यावेळी मोठ्या प्रमाणात अनेक भक्त मंडळी या जन्मोत्सव सोहळ्यात सहभागी झाली होती.
या जन्मोत्सव सोहळ्याची सुरुवात गुरुचे परमशिष्य मानकोजी यांनी दत्त जयंतीच्या शुभमुहूर्तावर १७ व्या शतकात पासून सुरू करण्यात आली ती परंपरा आज सुद्धा २१ व्या शतकात कायम आहे असुन मोठ्या भक्तिभावाने साजरी केली जाते आहे.
या जन्मोत्सव सोहळ्यासाठी शेलगाव राजेगोरे येथील गुरुचे परमशिष्य आनसाची यांची पालखी गुरूच्या भेटीसाठी व जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यासाठी पाच दिवस मुगट येथे मुक्कामास येते व हा जन्मोत्सव सोहळा साजरा करून एकादशीचा मुहूर्तावर आपल्या गावी शेलगाव राजेगोरे येथे प्रस्थान करते. ही परंपरा आज सुद्धा १७ व्या शतकापासून अखंडितपणे चालू आहे. या जन्मोत्सव सोहळ्यात शेलगाव राजेगोरे येथील प्रत्येक घरातील एक व्यक्ती या जन्मोत्सव सोहळ्यात उपस्थित असतोच. यावर्षी सुद्धा मोठ्या संख्येने शेलगाव राजेगोरे व परिसरातील अनेक गावातील भक्तमंडळी या जन्मोत्सव सोहळ्यात मोठ्या संख्येने उपस्थित होती. दुपारी १२ वाजता जन्मोत्सव साजरा केल्यानंतर दुपारी दहीहंडी फोडली जाते.
सद् गुरु श्री.आत्माराम महाराज यांच्या भेटीसाठी परमशिष्य आनसाजी (शेलगाव राजेगोरे) येथून गुरूच्या भेटीस येतात ही परंपरा अखंडितपणे शेलगाव येथील भक्तांकडून सुरू आहे. गुरु चरणी अपार श्रद्धा व भक्ति असल्यामुळे गुरूंनी अनेक भक्तांना सद् मार्ग दाखवलेला आहे.गुरुनी भक्तांना अनेक दृष्टांत देले आहेत. भक्ताच्या हाकेला धावून येतात असा अनेक भक्ताचा अनुभव आहे.
यावर्षी सुद्धा जन्मोत्सव सोहळा निमित्य मोठ्या प्रमाणात यात्रा भरली होती. मोठ्या संख्येने अनेक दुकाने या ठिकाणी लावण्यात आली होती. यावेळी मोठ्या हर्ष उल्हासात सद् गुरु संत श्री आत्माराम महाराज यांचा जन्मोत्सव सोहळा संपन्न झाला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा