१००% अनुदानासाठी नांदेडच्या सौं जयश्री पाटील , सौ वर्षा पांडागळे यांचे मुंबईत अन्नत्याग आंदोलन सुरू

 संपादक आशिष मुगटकर



नांदेड जिल्हा प्रतिनिधी 

दि 8 राज्यातील प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक अंशतः अनुदानावरील कर्मचारी यांना शासनाने 20 टक्के 40 टक्के 60 टक्के वेतन अनुदान मंजूर केलेले आहे. सदर कर्मचारी हे 100% अनुदानास पात्र असतांनाही शासनाकडून त्यांना केवळ 20 टक्के अनुदान मंजूर करण्यात येत आहे या शिक्षक व शिक्षेकेतर कर्मचारी यांचा पुढील अनुदानाचा वाढीव टप्पा प्रत्येक वर्षी माहे एप्रिल महिन्यात बदलणे अपेक्षित असताना तो बदलत नाही, दि 9 नोव्हेबर 2023 रोजी मा शिक्षण मंत्र्यांनी आझाद मैदानावर येवून लेखी स्वरूपात अश्वासन देवूनही शिक्षकांना न्याय मिळत नाही यासाठी त्यांना सातत्याने आझाद मैदान मुंबई या ठिकाणी आंदोलन करावे लागते यामध्ये शिक्षकांचा शैक्षणिक वेळ वाया जातो.

       अनुदान घेत असलेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी हे शंभर टक्के अनुदानास पात्र असूनही त्यांना 20 टक्के अनुदान दिले जात आहे ही बाब अन्यायकारक आहे.तरी 20%40%60%अनुदान घेत असलेल्या शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांना 15/ 11/ 2011 च्या व 26 जून 2014 च्या शासन निर्णयान्वये 100%टक्के वेतन अनुदान अर्थसंकल्प अधिवेशनात मंजूर करून या राज्यातील 63000 शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांना न्याय द्यावा यासाठी नांदेड जिल्हयासह  संपुर्ण महाराष्ट्रातील सर्व विना तथा अशंतः अनुदानित  शिक्षकांनी ३ जानेवारी 2023 बुधवार रोजी होणाऱ्या शिक्षक समन्वय संघ्याच्या आझाद मैदान मुंबई येथे उपस्थित आहेत व आजपर्यत कोनीही आंदोलनाची दखल घेत नसल्याने दिः ८ जानेवारी पासुन प्रा. दिपक कुलकणी, ज्ञानेश चव्हान, रविकांत जोजारे, बहिरीनाथ सोकांडे यासह नांदेडच्या महिला प्राध्यापक सौ जयश्री पाटील नांदेड, सौ. वर्षा पांडागळे नांदेड आदि शिक्षक अन्नत्याग आंदोलन करीत जोपर्यंत पुढील  दिः1 जानेवारी 2024 पासून वाढीव टप्पा वाढ शासन आदेश निघेपर्यत माघार घेणार नाही तरी शासनाने महिलांच्या या अन्नत्याग आंदोलनाची दखल घेऊन त्वरीत न्याय द्यावा व नांदेड जिल्हयातील सर्व शिक्षकांनी सहभागी होवून आपल्या हक्काच्या लढाईचे भागीदार व्हा असे आवाहन शिक्षक समन्वय संघाच्या वतीने समन्वयक प्रा कैलास खानसोळे यांनी केली आहे

.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

लोकप्रिय बातम्या