मुदखेड तालुक्यातील मुगट येथील भारतीय बौद्ध महासभा ग्राम शाखा मुगट च्या वतीने त्याग मूर्ती माता रमाबाई भीमराव आंबेडकर यांची १२४ वी जयंती मोठ्या उत्साहात विहारात साजरी करण्यात आली.
माता रमाई यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित सर्व मंडळींच्या हस्ते करण्यात आले.प्रतिमेला पुष्पहार ,दिप प्रज्वलन करण्यात आले.
गावातील पंचशील बुद्ध विहार मध्ये अनेक उपासक व उपासिका यांच्या प्रमुख उपस्थितीत जयंती उत्साहात संपन्न झाली.
या प्रसंगी विशेष पोलिस पाटील भगवान हाटकर, साहेबराव हाटकर, ग्रामपंचायत सदस्य देवदत्त हाटकर, उत्तम हाटकर, अशोक हाटकर, प्रल्हाद हाटकर, राहुल हाटकर, चंद्रमणि हाटकर, लक्ष्मण हाटकर, साहेबराव हाटकर, तुकाराम हाटकर, गौतम हाटकर, गोविंद हाटकर सकाळ पेपर तसेच रमाई मंडळाच्या महिला गोदावरीबाई हाटकर, सुशिलाबाई हाटकर, रेखाबाई हाटकर, संध्या हाटकर,रेणूकाबाई गवारे, रुखमीनबाई हाटकर, सुलोचनाबाई हाटकर, आम्रपाली गवारे, सुरेखा हाटकर सुमनबाई हाटकर, शशिकलाबाई हाटकर या प्रसंगी उपस्थित होते .




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा