मुदखेड तालुका / प्रतिनिधी
मुदखेड शहरातील भिमनगर येथील कु.सयोगिता कांबळे सेट परिक्षेत उत्तीर्ण झाली आहे म्हणून तिचे सगळीकडे कौतुक होत आहे.सर्व सामान्य कुटुंबात जन्मलेल्या कु.संयोगिता हिने जिद्द व चिकाटीच्या जोरावर अभ्यासात सातत्य ठेवुन आज हे यश मिळवले आहे.
विद्यापीठ अनुदान आयोग पुरस्कृत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने सप्टेंबर २०२१ मध्ये घेण्यात आलेल्या प्राध्यापक पात्रता परीक्षेत कु. संयोगिता अरविंद कांबळे ही इंग्रजी विषयात उत्तीर्ण झाली आहे.
कु.संयोगिता कांबळे हिचे शालेय शिक्षण मुदखेड येथे महात्मा गांधी विद्यालय आणि महाविद्यालयीन शिक्षण राजीव गांधी महाविद्यालय मुदखेड व एमए (इंग्लिश) पीपल्स कॉलेज नांदेड येथे पूर्ण झाले आहे.
वडील अरविंद कांबळे यांनी मुलीच्या शिक्षणासाठी आपार कष्ट केले. मिळेल ते काम करुन आणि नांदेड शहरामध्ये ऑटो चालवून त्यांनी आपल्या मुलीच्या शिक्षणासाठी कुठल्याही प्रकारची कमतरता भासू दिली नाही.
वडीलांच्या या आपार कष्टामुळेच त्यांची मुलगी कु. संयोगिता कांबळे हिने सेट परीक्षेत यश प्राप्त केले आहे. तिच्या ह्या यशाबद्दल महात्मा गांधी विद्यालय आणि राजीव गांधी महाविद्यालयतील शिक्षकांकडून व तीचे (आजी आजोबा) निर्मलाबाई किशन कांबळे, रमा अरविंद कांबळे (आई वडील)सारिका रविंद्र कांबळे (काका काकू)कविता प्रविण कांबळे (काका काकू)सर्व परिवारांकडून कौतुक केले व आभिनंदन करुन पुढील यशासाठी शुभेच्छा दिल्या.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा