मुगट जिल्हा परिषद सदस्या प्रतिनिधीच्या मध्यस्थीने अनेक वर्षापासूनचे रखडलेले काम अखेर मार्गी ! .

 दलित वस्तीतील नालीचा प्रश्न अखेर निकाली....

संपादक आशिष मुगटकर

मुदखेड तालुका / प्रतिनिधी

मुगट येथील नवी आबादी नालीचा प्रश्न अनेक वर्षापासून रखडलेला होता परंतु आज स्वतः जिल्हा परिषद सदस्याचे प्रतिनिधी भिमराव पाटील कल्याणे यांनी प्रत्यक्ष जागेची पाहणी करून चर्चा करून या समस्येवर तोडगा काढून प्रश्न अखेर मार्गी लावला आहे.

नवी आबादी याठिकाणी असलेल्या वडार वस्ती चे सांडपाणी गेल्या अनेक वर्षापासून नाली अभावी जागेवरच साचत होते. त्यामुळे या भागातील राहणाऱ्या लोकांना मोठ्या प्रमाणावर घाणीचा व सांडपाण्याचा त्रास सहन करावा लागत होता ग्रामपंचायतीने नाली करण्यासाठी अनेक वेळा प्रयत्न केला पण त्याचा काही लोकांनी विरोध केला होता.



 त्यामुळे निधी असून सुद्धा या नालीचे काम करता येत नव्हते. या वस्तीचे संपुर्ण सांडपाणी जवळील असलेल्या पशुवैद्यकीय दवाखान्यात समोर मोठ्या प्रमाणात साचत होते त्याचं घाण पाण्यातून पशुपालक आपल्या पशुना दवाखान्यात नेत - जात असत. अनेक वेळा या ठिकाणी ग्रामपंचायतला लोकांनी तक्रारी केल्या होत्या. 

त्यामुळे ग्रामपंचायतीनी अखेर हा प्रश्न हाती घेतला परंतु आज जिल्हा परिषद सदस्या प्रतिनिधी भिमराव पाटील कल्याणे यांच्या हस्तक्षेपामुळे आज हा प्रश्न कायमचा सोडवला गेला आहे.मुगट जिल्हा परिषद सदस्या सौ.अरुणाताई कल्याणे यांच्या प्रयत्नातून गावात अनेक विकासकामे मोठ्या प्रमाणात केली आहेत व अनेक कामे सुरू आहेत.  

याठिकाणच्या नागरिकांन कडुन आजही नाली करण्यासाठी पुन्हा थोडा विरोध काही व्यक्तीने केला पण तो नंतर मावळला. 

याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्या प्रतिनिधी भिमराव पाटील कल्याणे, गावचे सरपंच प्रतिनिधी धोंडीबा वंजे, ग्राम विकास अधिकारी राजेश्वर भुरे, पंचायत समिती अभियंता दरबस्तरवार पोलीस कर्मचारी, तंटामुक्ती अध्यक्ष माधवराव पाटील कल्याणे, पोलीस पाटील भगवान हाटकर, ग्रामपंचायत चे कर्मचारी सर्व ग्रामपंचायत सदस्य व गावातील अनेक मंडळी या ठिकाणी उपस्थित होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

लोकप्रिय बातम्या