पोलीस जमादार श्री. राजकुमार शेंडगे यांचे निधन

 संपादक आशिष मुगटकर





नांदेड जिल्हा / प्रतिनिधी

लोहा येथील येथील रहिवासी असलेले पोलिस जमादार श्री.राजकुमार निवृत्तीराव शेंडगे यांचे वयाच्या ४९ व्या वर्षी अल्पशा आजाराने दि.१७रोजी रात्री ११:३० वाजता नांदेड येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले. 

नांदेड येथील एस.पी.कार्यालयात जमादार पदावर कार्यरत आहे.त्यांचा अंत्यविधी लोहा येथील स्मशानभूमीत दि.१८रोजी दुपारी १२:००वाजता करण्यात येणार आहे.त्यांचा या निधनामुळे लोहा शहरात दु:खाची शोककळा पसरली आहे.

त्यांच्या या अकाली निधनामुळे परिवारास दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

त्यांच्या पश्चात पत्नी, दोन भाऊ, दोन मुली,एक मुलगा,नातु, असा परिवार आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

लोकप्रिय बातम्या