रा.यु.कॉं.तालुकाध्यक्ष पदासाठी मुलाखती
मुदखेड तालुका / प्रतिनिधी
राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीची आढावा बैठक शासकीय विश्रामगृह मुदखेड येथे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष शिवानंद शिप्परकर यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष मा. धनंजय सुर्यवंशी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.
नुकत्याच राज्यात झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांत राष्ट्रवादी कॉंग्रेसने चांगलीच मुसंडी मारली आहे .
येणाऱ्या निवडणुकांसाठी पक्ष बांधणी सुरू असून नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष धनंजय सुर्यवंशी यांचे युवक संघटन वाढविण्याच्या दृष्टीनें जिल्हाभर दौरे चालू आहेत,
आज मुदखेड येथे बऱ्याच दिवसापासुन राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष व शहराध्यक्ष ही पदे रीक्त आहेत. त्यासाठी जिल्हाध्यक्ष धनंजय सुर्यवंशी यांनी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसची आढावा बैठक घेऊन इच्छूकांच्या मुलाखती घेऊन निवड प्रक्रीयेला सुरूवात केली आहे.
जिल्हाध्यक्ष धनंजय सुर्यवंशी यांनी आपल्या मनोगतात गाव तेथे शाखा घर तेथे कार्यकर्ता जोडून तालुक्यात युवकांची भक्कम फळी तयार करून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अधिक उमेदवार निवडून आणू असा विश्वास व्यक्त केला.
यावेळी प्रास्ताविक राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष शिवानंद पाटील शिप्परकर यांनी केले,विधानसभा प्रभारी प्रमोद देशमुख यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले.
यावेळी मुदखेड तालुका प्रभारी चंद्रकात पाटील टेकाळे,शहराध्यक्ष महंमद बुराण,विधानसभा सचिव विशाल महाजन,जिल्हा कार्यकारीणी सदस्य चक्रधर पाटील कळणे,तालुकाउपाध्यक्ष प्रदीप पाटील ढगे, विद्यार्थी आघाडीचे प्रशांत कल्याणे, आनंदा टीपरसे,गोविंदराव मुंगल,जळबाजी हाटकर,हनमंत नटूरे,भुजंग गायकवाड , माधव मुंगल,शिवाजी किरकन, पिंटू लष्करे, संतोष बोडलवाड, कोंडीबा गायकवाड,बालाजी गाढे, खडोजी चरले, तिरुपती कुदारे , कैलास गाढे,माधव राठोड ,विलास मुगल,गोविंद डोणगावकर,राम पाटील,आनंदा नटूरे, पांडू पाटील मुंगल ,बालाजी गोपाळ ,बालाजी मिरेवाड, हणमंत सूर्यवंशी,बाबाराव शिंदे , आकीत आडे ,आनंदा पाटील, ऋषिकेश पाटील,संतोष मुगल ,शिवाजी माने ,पांडूरंग गायकवाड,माधव वाडीकर ,आशिष कल्याने,जीवन,शकर गायकवाड ,परमेश्वर दरेगावकर,पवन नटूरे,लोकडेश्र्वर कराळे , गंगाधर शिंदे आणि आदींची उपस्थिति होती.कर ,पवन नटूरे,लोकडेश्र्वर कराळे , गगा धर शिंदे आणि आदींची उपस्थिति होती.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा