महाराष्ट्र प्रदेशकाँग्रेसचे २७ पदाधिकारी नांदेड जिल्हाच्या मदतीला

 "भारत जोडो पदयात्रा" यशस्वी करण्याची  व्यवस्था पुर्ण


नांदेड जिल्हा / प्रतिनिधी 

 नांदेड जिल्ह्यातील भारत जोडो यात्रेच्या नियोजनासाठी लोकनेते, माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण यांच्या मागणीनुसार महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने प्रदेश स्तरावरील २७ पदाधिकारी त्यांच्या नेतृत्वाखाली  नांदेड जिल्ह्यात मदतीसाठी नियुक्त केले आहेत. 

यात्रा यशस्वी करण्याची  पुर्ण व्यवस्था झाली असुन एक आगळा कार्यक्रम होतो आहे हे या वरून  स्पष्ट  दिसते. 

महाराष्ट्राचे काँग्रेस प्रभारी एच. के. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली गेल्या आठवड्यात यात्रेच्या पूर्वतयारीसाठी मुंबईत झालेल्या बैठकीत माजी मुख्यमंत्री अशोकराव  चव्हाण* यांनी यात्रा व्यवस्थापनासाठी प्रदेश पदाधिकाऱ्यांची नेमणून करून त्यांच्यावर जिल्हानिहाय जबाबदारी देण्याची सूचना मांडली होती. नांदेड जिल्ह्यासाठी देखील काही पदाधिकारी नियुक्त करण्याची मागणी त्यांनी केली होती. त्यानुसार महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ. नाना पटोले यांनी एकूण २७ पदाधिकारी नांदेड जिल्ह्यासाठी नियुक्त केले आहेत. हे पदाधिकारी पुढील आठवड्यात नांदेडला दाखल होणार असून, नांदेड जिल्ह्यातील यात्रा पूर्ण यशस्वी  होईपर्यंत ते नांदेडलाच मुक्कामी राहणार आहेत. त्यांच्याकडे व्यवस्थापनासंदर्भातील विविध जबाबदारी सोपवली जाईल.

प्रदेश काँग्रेसने नांदेडसाठी नेमलेल्या २७ पदाधिकाऱ्यांमध्ये प्रदेश उपाध्यक्ष व विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आ.अमरनाथ राजूरकर व प्रदेश चिटणीस अँड. सुरेंद्र घोडजकर हे स्थानिक नेते तर गेल्या महीनाभरा पासुन नांदेड येथे नियोजनाची सुत्र सांभाळत आहेत त्यांचे सह  अतिरिक्त 25 राज्यभरातील प्रमुख पदाधिकारी यांच्या वर जबाबदारी दिली.  माजी मंत्री व प्रदेश कार्याध्यक्ष नसिम खान (मुंबई) माजी मंत्री व प्रदेश उपाध्यक्ष रमेश बागवे (पुणे ) आ. कैलास गोरंट्याल, डॉ. उल्हास पाटील,परभणी चे माजी खासदार  तुकाराम रेंगे पाटील, अँड. रामहरी रुपनवार, चारुलता टोकस, अँड. गणेश पाटील, किशोर गजभिये, सुभाष कानडे, हरिभाऊ शेळके, प्रदेश सरचिटणीस राजेश शर्मा, डॉ. राजू वाघमारे, रमेश शेट्टी, सचिन सावंत, उमाकांत अग्निहोत्री, विनायकराव देशमुख, अभिजित सपकाळ, प्रदेश चिटणीस अलका राठोड, अनिस कुरेशी, कॅ. निलेश पेंढारी, प्रकाश मुथा, सोनाली मारने, अँड. गौरी छाब्रिया व परभणी चे नेते तथा प्रदेश  प्रवक्ते डॉ. संजय लाखे पाटील यांचा समावेश आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

लोकप्रिय बातम्या