मुदखेड तालुका प्रतिनीधी.
दि २ रोजी मुदखेड तालुका कॉंग्रेस तसेच युवक काँग्रेसच्या वतीने शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी दि. ६ रोजी मंगळवारी मुदखेड तहसील कार्यालयावर शासनाच्या विरोधात रुमने मोर्चा काढण्यासाठी युवक काँग्रेसने यलगार पुकारला असल्याची माहिती नांदेड युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बालाजी गाढे यांनी मुदखेड येथे प्रसार माध्यमांशी बोलतांना दिली.
मुदखेड तालुका व जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने ता १ (गुरुवार) पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
या वेळी कॉंग्रेस कमिटी तालुका अध्यक्ष प्रताप देशमुख, कॉंग्रेस शहर अध्यक्ष कैलास गोडसे, कार्याध्यक्ष मोहम्मद गौस, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष मुजीब पठ्ठान, शहर उपाध्यक्ष सुर्यकांत चौदंते, अविनाश चौदंते, अब्दुल लतीफ यांची प्रमुख उपस्थिती होती. या वेळी राज्यातील भाजप प्रनित महायुती सरकार शेतकऱ्यांचे शोषण करीत असल्याचा घनाघात करण्यात आला, आरक्षणाच्या नावाखाली जाती-जातीत भांडने लावून तेड निर्माण करीत असल्याचा आला आहे.
या पुर्वी महायुतीच्या काळात करण्यात आलेली शेतकऱ्यांची कर्जमाफी फोल ठरली असून अजुनही तालुक्यातील बहुतांश शेतकरी वंचीत आहेत. या सोबतच पीक कर्ज, पीक विमा, प्रोत्साहन रक्कम, शेतकऱ्यांना मिळालेले नाही शेतकऱ्यांच्या पिकाला हमीभाव नाही अश्या अनेक मागण्या संदर्भात वेठीस धरले जात आहे, या शिवाय महावितरण कंपनिच्या भोंगळ कारभाराने कळस गाठला असून, महायुती शासणाच्या महावितरण खासगीकरणाचा निषेधार्ह सुरु असलेला विजेचा खेळ खंडोबा थांबला पाहिजे त्या साठी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने यलगार पुकारण्यात आला आहे.
शेतकर्यांना कर्जमाफी नव्हे तर कर्जमुक्ती दिली पाहिजे, पीक कर्ज तातडीने देण्यात यावे गेल्यावर्षीचा पिक विमा शेतकऱ्यांना देण्यात यावा महावितरण अंतर्गत शेतकऱ्यांना बारा तास वीजपुरवठा देण्यात यावा, चोवीस तास सींग फेज देणृयात यावा, एक गांव एक लाइनमन मिळालाच पाहिजे, विज भार कमी करण्यासाठी विद्युत केंद्राची निर्मिती करण्यात यावी. ग्रामीण भागात जोडणारे रस्ते खड्डे मुक्त करण्यात यावे.
या शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्यांची निवेदन शासनापर्यंत पोहचविण्यासाठी तहसिलदारांना लेखी निवेदन देण्यात येणार आहे. निद्रावस्थेतील भाजप प्रनित महायुती शासनाच्या विरोधात दि. ६ (मंगळवार) सकाळी १० वा ठाकरे चौकातून भव्य रुमने मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात मुदखेड तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन नांदेड जिल्हा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बालाजी गाढे यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा