राष्ट्रीय महामार्गावरील कॅनॉल पुलाजवळ पाण्यात कार कोसळून अपघात

 अपघातात जीवीत हानी टळली

संपादक आशिष मुगटकर

मदत कार्य :- राष्ट्रीय महामार्गावरील कॅनॉल पुलाजवळ पाण्यात कार कोसळली ती कार काढण्यासाठी मदत कार्य करताना पोलीस कर्मचारी, ग्रामस्थ.

बारड / प्रतिनिधी

बारड राष्ट्रीय महामार्गावरील महामार्ग पोलीस केंद्राच्या एक किलोमीटर अंतरावर असलेल्या कॅनल पुलाजवळ कार पाण्यात कोसळून अपघात घडल्याची घटना रात्री उशिरा घडली आहे कारमधील तिघेजण कॅनॉलच्या मोठ्या नाल्यांमध्ये बुडत असताना बारड महामार्ग पोलिस व बारड ग्रामस्थांच्या मदतीने या तिघांचा जीव वाचवण्यासाठी यश मिळाले असून त्यांच्या प्रयत्नाने तिघांंचा जीव वाचला आहे.

कार चालक कोडींबा जाधव वय ३५वर्षे रा.हसापुर ता.भोकर येथील रहीवाशी असुन ते आपल्या परिवारासह पत्नी  रुक्मिणीबाई जाधव,मुलगी प्रगती, मुलगा विश्वास, हे चौघे गावाकडे रात्री च्या वेळी कार क्रमांक एम.एच.२६ए.एस.४९९९या गाडीत जात असताना बारड शेंबोली कँनोल पुलाजवळ गाडी थांबवून लघुशंकेसाठी खाली उतरले हँडब्रेक न लावता गाडी थांबवली नुटल मध्ये असलेलेली गाडी कँनोल पुलाच्या उताराच्या दीशेने कँनोल च्या वाहत्या पाण्यात पडली पाण्यात पडलेल्या कार मध्ये परिवार असल्याने जाधव यांनी थेट महामार्ग पोलीस केंद्र गाटले घटनेची माहिती महामार्ग पोलीसांना मिळताच क्षणाचाही विलंब नकरता घटनास्थळी धाव घेत कारमध्ये अडकलेल्या जाधव यांच्या पत्नी व दोन मुलांना बारड ग्रामस्थानच्या मदतीने कँनोल पाण्यात पुलामध्ये अडकलेल्या कार मधुन तिघांना सुखरुप बाहेर काढण्यात आले आहे.


घटनास्थळी तातडीने मदत मिळाल्याने पुढील अनर्थ टळला असुन अपघातात अडकलेल्या तिघांना ही बारड रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आला आहे.

घटनास्थळी महामार्ग पोलीस व बारड ग्रामस्थ वेळीच पोहचल्याने "देव तारी त्याला कोण मारि म्हणी नुसारच त्यांना बचाव दुतच बनले आहे.

यावेळी घटनास्थळी वर बारड उपसरपंच बाळासाहेब देशमुख,प्रकाश देशमुख,युवा कार्यकर्ते विठ्ठल गोडसे तर पोलीस आधीक्षक डॉ. अनिता जमादार, पोलीस निरीक्षक अरुण केंद्रे, यांच्या मार्गदर्शना खाली पोलीस निरीक्षक बालाजी यवते,योगेश भद्रे, शेवाळकर, चनाजोलु, सातारे,गणी,श्रीनिवास, श्रीमंगले,थाडके आदीने घटनास्थळी परिश्रम घेत पाण्यात पडलेल्या कार मधुन बाहेर काढून तिघांचा जीव वाचवला आहे.

गेल्या अनेक दीवसापासुन राष्ट्रीय महामार्गाचे कामे सुरु आहेत परंतु धोकादायक ठिकाणी रेडथिप किंवा दिशा फलक हलगर्जीपणे लावले असल्याने अनेक अपघातात घटना घडल्या आहेत या घटनेस समंधीत कंट्रशन राष्ट्रीय महामार्ग विभाग जबाबदार असल्याने समंधीतांनवर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थान कडून करण्यात येत आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

लोकप्रिय बातम्या