हदगाव / तालुका प्रतिनिधी
हदगाव-हिमायतनगर तालुक्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगाम २०२०- २०२१ मध्ये सोयाबीन, कापसाचा पेरा केला होता. अनेक शेतकऱ्यांनी ऑनलाइन पिकाचा पिक विमा भरला होता.त्यात सोयाबीन कापूस यांचा समावेश होता.
सोयाबीन, कापूस पीक काढणीच्या वेळी या परिसरात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली त्यात मोठ्या प्रमाणात वर शेतकऱ्याच्या सोयाबीन, कापूस या पिकाचे मोठे नुकसान झाले होते. सोयाबीनच्या ढगा खाली पाणी जाऊन त्याला मोड फुटले होते.तर अनेक सोयाबीन ढग पाण्यावर तरंगत होतो. या नुकसानीच्या संबंधी अनेक शेतकऱ्यांनी पिक विमा कंपनीकडे ऑनलाइन तक्रार केली तर अनेक शेतकरी ऑनलाइन तक्रार करू शकले नाही. त्यामुळे अशा शेतकऱ्यांना पिक विमा मिळणार की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे.?
यावेळी सुध्दा बळीराजा संकटात सापडला आहे. शासनाने सर्वच शेतकऱ्यांना पिक विमा मिळवून द्यावा अशी मागणी किसान ब्रिगेड चे जिल्हाध्यक्ष भगवानराव देशमुख यांनी एका लेखी निवेदनात हदगाव तहसीलदार यांच्या कडे मागणी केली आहे.
निवेदनावर गणेशराव तावडे, नारायण तावडे सह आधीच्या स्वाक्षर्या आहेत.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा