बारड / प्रतिनिधी
बारड वाडीतील अल्पभूधारक शेतकरी संतोष देवबा सुकापुरे वय ३८वर्षे रा.बारड वाडी यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतात लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली असून घटनेबाबत हळहळ व्यक्त करण्यात येतआहे.
बारड वाडी शिवारात सुकापुरे यांची दीड एकर शेती आहे मागील दोन वर्षा पासून शेतीची सतत नुसकानीत असल्याने ची होणारी नापीकी मुळे अनेक नैसर्गिक संकटे शेतीवर असल्याने शेतकरी अडचणीत होता त्यातच महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा बारड कडून शेतीचे व शेती पिकाच्या मशागती साठी अंशी हजार रुपये कर्ज घेतले होते शेतीच्या सतत च्या नापीकी व निसर्गाच्या अवकृपेमुळे कर्ज कसे परतफेड करावे या मानसिक तनावात राहून सततच्या चिंतेमुळे नैराश्य होऊन सुकापुरे यांनी शेतातील लिंबाच्या झाडाच्या फांदीला कपड्याच्या दोरीने गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली आहे.भाऊ गजानन सुकापुरे यांच्या जबाबावरुन आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आले आहे पुढील चौकशी कामी से.पो.नी यांच्या आदेशाने पो.उपनिरीक्षक वानोळे यांच्या कडे दीला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा