मुदखेड तालुका/ प्रतिनिधी
देशाचे माजी संरक्षणमंत्री, माजी केंद्रिय कृषि मंत्री,महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचा दिनांक १९.१०.२०२१ रोजी कोजागिरी पोर्णिमे निमित्त सहस्त्रचंद्र दर्शन सोहळ्याचे राज्यभर राष्ट्रवादी महीला कॉंग्रेसच्या वतीने प्रदेशाध्यक्षा तथा महीला आयोगाच्या अध्यक्षा मा.रुपालीताई चाकणकर यांच्या सुचनेनुसार राज्यभर आयोजन करण्यात आले.
त्याचप्रमाणें जि.प.प्रा.शा.डोंगरगाव येथे "सहस्त्रचंद्र दर्शन सोहळ्याचे" आयोजन मुदखेड तालुका राष्ट्रवादी महीला कॉंग्रेसच्या अध्यक्षा सौ.पुजाताई व्यवहारे यांनी केले होते, यावेळीं तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शिवानंद पाटील शिप्परकर,गावचे सरपंच शिवानंद पाटील व्यवहारे,गणेशराव व्यवहारे सहशिक्षक श्री शिवाजी पाटील सर,यांचे शुभहस्ते विद्यार्थ्याना शालेय साहीत्य वाटप करण्यात आले.
कार्यक्रमानुरुप विद्यार्थ्याना कोजागिरी पोर्णिमेचे महत्व,सहस्त्रचंद्र दर्शन या कार्यकमाची संकल्पना व शरदचंद्रजी पवार साहेब यांचे सामाजीक, शैक्षणीक कार्याविषयी शिवानंद पाटील शिप्परकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा