मुदखेड /तालुका प्रतीनिधी
मुदखेड तालूक्याच्या दक्षिण भागात अगदी शेवटच्या टोकावर वसलेल्या महाटी या गावाला सूरुवाती पासूनच चळवळीचा वसा आहे.सूरुवातिला बसपा नंतर संभाजी ब्रिगेड व हल्ली वंचीतच्या माध्यमातून मराठा समाजासह गावातील मागास व ईतर मागास वर्गात भाईचाराची एक झलक पहायला मिळते.ईकडे आंबेडकर जयंती ही बौद्धानीच केली पाहिजे किंवा साठे जयंती ही मातंगानीच करायची ही प्रथा लोकांनी संपूष्टात अनून एक वैचारीक आदर्श जागृत केला आहे.
त्याच अनूशंगाने काल धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे औचित्य साधत वंचित आघाडीच्या वतीने प्रस्तुत कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले.येथिल बौद्ध विहारात घेण्यात आलेल्या सदर कार्यक्रमाची सूरुवात महापूरुषांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली.लागलीच पंचशिल ध्वजारोहणाला सूरुवात झाली.
मागास समाजाच्या न्याय व हक्कासाठी ज्यांची नेहमीच सहकार्याची भुमिका असते असे समाजातिल पत्रकार साहेबराव गागलवाड यांना पंचरंगी ध्वज फडकवन्याचे भाग्य लाभले. सामुदायीक पंचशिल आणि त्रीशरण गाथा गृहण करण्यात आली.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे सिद्धार्थ जाधव,अशोक जाधव,चंद्रकांत गागलवाड,माधव जाधव,संभाजी जाधव,रवी कुमार जाधव,सूनिल जाधव,सकळोची जाधव,भिमराव भदरगे, शेषराव पवार,बहुजन चळवळिचा भाग असलेल्या कौतीकबाई जाधव व सागरबाई जाधव यांनी परीश्रम घेतले.
आंबेडकरी विचार धारेचे संघदिप ढवळे यांनी प्रस्तुत कार्यक्रमाचे सूत्र संचालन केले.
तर श्रध्देय बाळासाहेब आंबेडकरांच्या संघर्षास प्रेरीत वंचित आघाडीच्या रवी कुमार जाधव यांनी उपस्थितांचे आभार मानले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा