एनसीसी कॅडेट्स राष्ट्र निर्माण कार्यात हातभार लावतात -कर्नल रंगाराव
मुदखेड तालुका / प्रतिनिधी
दि. २१ रोजी ५२ महाराष्ट्र बटालियन एनसीसी नांदेड द्वारा आयोजित वार्षिक प्रशिक्षण शिबिराची सुरुवात माता साहेब गुरुद्वारा मुगट या ठिकाणी दिनांक २० रोजी झाली. हे वार्षिक प्रशिक्षण शिबिर आठ दिवस चालणार आहे .आज प्रशिक्षणाची सुरुवात ५२ महाराष्ट्र बटालियन नांदेड चे कमांडिंग अधिकारी कर्नल रंगाराव यांच्या प्रारंभिक भाषणांनी झाली त्यात त्यांनी वरील उद्गार काढले. एनसीसीचे विद्यार्थी स्वतःची पिढीच बदलू शकतात तसेच राष्ट्र कार्यात त्यांचा वाटा नेहमीच महत्त्वाचा राहिलेला आहे. नजीकच्या काळात व्यावसायिक संधी सुद्धा एनसीसी कॅडेट्स ला उपलब्ध झालेल्या आहेत त्याचा फायदा कॅडेट्सनी स्वतः फायदा घेऊन समाजापर्यंत पोहोचावा असे आव्हान त्यांनी केले. सर्वप्रथम हे शिबिर चालविण्यासाठी माता साहेब गुरुद्वाराने जागा उपलब्ध करून दिली त्याबद्दल गुरुद्वाराच्या प्रमुखांचे त्यांनी आभार मानले. या वार्षिक प्रशिक्षण शिबिरात परभणी ,हिंगोली व नांदेड जिल्ह्यातील एकूण ५०५ कॅडेट सहभागी झालेले आहेत. कॅम्प कमांडंट म्हणून स्वतः कर्नल रंगराव काम पाहत आहेत .डेप्युटी कॅम्प कमांडर म्हणून लेफ्टनंट कर्नल वेटरी वेल्लू , कॅम्प अड जूनंट म्हणून फर्स्ट ऑफिसर श्री एस.डी .राठोड हे काम पाहत आहेत. या प्रशिक्षण शिबिरासाठी सुभेदार मेजर ललित कुमार मेहतासुभेदार गोपाल सिंग , महमद लाल, वैजनाथ चौगुले रमन शर्मा फर्स्ट ऑफिसर शिवराज कदम सेकंड ऑफिसर गोविंदराव केंद्रे ,डॉ. माणिकराव गाडेकर ,देविदास शेटे पुरुषोत्तम जाधव, सोनल जयस्वाल व डॉ. किशोर इंगळे ने सु बो महाविद्यालय , श्री गिरीश पारशेवार सर त्याचबरोबर पी आय स्टाफ ,सुनील कुमार हावलदार कटरे,एसवीर, योगेश कुमार ,घोस, जगतराम जशबीर कुमार ,नेगी ,सिधप्पा, सुरजकुमार ,संजयकुमार अरविंद राज्य व केंद्र शासनाचे कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा