दिल्लीतील महाराष्ट्र सदनात देशातील प्रमुख शिवसेनीकांचा विशेष कार्यक्रम

 संपादक आशिष मुगटकर



नांदेड जिल्हा/प्रतिनिधी

दिल्लीतील महाराष्ट्र सदन येथे पार पडलेल्या विशेष कार्यक्रमात देशाच्या कानाकोपऱ्यातुन आलेल्या शिवसेनेच्या सर्व प्रदेश प्रमुख उपस्थित होते. या सगळ्यांनी मिळून वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर चालणाऱ्या शिवसेनेला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना आमची भूमिका विशद केली. 



वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार तसेच वंदनीय गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या शिकवणीनुसार मार्गक्रमण करण्याचा निर्णय आम्ही घेतला असून कोणतीही गद्दारी केलेली नाही असे निक्षून सांगितले. हिंदुत्वाच्या विचारांशी प्रतारणा करून असंगाशी झालेला संग सहन करण्यापलीकडे गेल्याने बाहेर पडलो असे आवर्जून सांगितले. देशाच्या कानाकोपऱ्यातुन मिळणारा पाठींबा पाहता आपापल्या भागात स्थानिक भुमिपूत्रांचे प्रश्न सोडविण्यासाठी जरूर लढा. आपल्याला याकरिता सर्वतोपरी मदत नक्की करू अशी ग्वाही यासमयी बोलताना दिली. 

यात मध्यप्रदेशचे राज्यप्रभारी थाडेश्वर महावर, मध्यप्रदेशचे राज्य प्रमुख ऍड.राजीव चतुर्वेदी, राजस्थानचे राज्यप्रमुख लखन सिंह पवार, उत्तर प्रदेशचे महासचिव अभय द्विवेदी, उत्तर प्रदेशचे महासचिव अनिरुद्ध देव त्रिपाठी, गुजरातचे  राज्यप्रभारी जिमी अडवाणी, गुजरात राज्यप्रमुख एस. आर. पाटील, छत्तीसगड राज्यप्रमुख धनंजय परिहार, दिल्ली राज्यप्रमुख संदीप चौधरी, दिल्ली राज्यप्रभारी नीरज सेठी, तामिळनाडू राज्यप्रमुख मणीभारती, पुद्दुचेरी राज्यप्रमुख नमचिवायन, मणिपूर राज्यप्रमुख टोम्बी सिंह, आसाम राज्यप्रमुख आणि नॉर्थ ईस्ट प्रभारी परमिंदर सिंह मनचंदा, पश्चिम बंगाल राज्यप्रमुख शांती दत्त, त्रिपुरा राज्यप्रमुख शांती दत्त यांचा समावेश होता. 

यावेळी शिवसेनेचे खासदार राहूल शेवाळे, खासदार हेमंत पाटील, शिक्षण मंत्री दीपक केसरकर, उद्योग मंत्री उदय सामंत, कॅप्टन अभिजित अडसूळ हेदेखील उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

लोकप्रिय बातम्या