नांदेड जिल्हा / प्रतिनिधी
दिल्ली येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अधिवेशनचे आयोजन करण्यात आले होते. त्यानिमित्ताने नांदेड येथील राष्ट्रवादी जेष्ठ नागरिक संघाचे उपाध्यक्ष प्रा.नारायण शिंदे व त्यांच्या सहकार्यानी आदरणीय जेष्ठ नेते शरदचंद्रजी पवार साहेब यांची सस्नेह भेट घेतली.
आदरणीय जेष्ठ नेते शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या जनपथ येथील त्यांच्या निवासस्थानी जाऊन साहेबांना भेट दिली. प्रा.शिंदे यांनी वेणू हि कादंबरी , रंग एकतेचा व कांहीं एकांकिका हा नाट्य संग्रह त्यांना भेट दिला.
भेट देताच साहेबांनी प्रतिक्रिया दिली, मी वाचून तुम्हाला अभिप्राय कळवतो !कार्यक्रमाच स्थळं दुर आहे,पायी जाऊ नका टॅक्सीने जान्याचा सल्ला दिला.
एवढ्या कमी वेळात ते माझ्यासी बोलले. मला या गोष्टीचा खुप मोठा आनंद झाला. मला या वयात माझ्या सारख्या एकटं जीवन जगण्यार्याला हि मोठी उर्जा आहे असे मला वाटते.साहेबांना भेटण्याचं माझं खुप दिवसांच स्वप्न पूर्ण झालं.असे प्रा.नारायण शिंदे हे मातृभूमीशी बोलताना म्हणाले.
या भेटीच्या वेळी प्रा.डि बी.जाभंरुणकर ,प्रा. अनमोलसिगं कामठेकर,मा सुभाष गायकवाड, इंजिनिअर भोसीकर ,दगडगांवकर , डॉ विक्रम देशमुख आदी उपस्थित होतो.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा