मुदखेड तालुका प्रतिनिधी
मुदखेड येथे दि. ११ सप्टेंबर रोजी शहरातील बौद्ध प्रशिक्षण केंद्र या ठिकाणी माजी सैनिकांच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाची सुरुवात प्रथमता तथागत गौतम बुद्ध डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्रिवार वंदन करण्यात आले.
यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये कु. संयोगिता अरविंद कांबळे (शिक्षण - एम.ए. इंग्लिश,एम.एच.सि.ई.टी.२०२१) कु.आदिती बाबासाहेब चौदंते (शिक्षण - नीट २०२१ उत्तीर्ण) शैलेश सुनील चौदंते (शिक्षण नीट २०२२ उत्तीर्ण) या गुणवंत विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा माजी सैनिकाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
तसेच उपस्थित असलेल्या सर्व माजी सैनिकांचा बौद्ध प्रशिक्षण केंद्र यांच्या वतीने शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान सत्कार करण्यात आला.
या सत्कार कार्यक्रमा प्रसंगी माजी सैनिक विकास समिती नांदेड जिल्हा सल्लागार लक्ष्मणराव देवदे यांच्या वतीने गुणवंत विद्यार्थी शैलेश चौदंते याच्या पुढील शिक्षणासाठी माजी सैनिक यांची एका महिन्याची संपूर्ण पेन्शन रोख रक्कम पंचवीस हजार रुपये २५०००/देण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी माजी सैनिक विकास समिती जिल्हा सल्लागार लक्ष्मणराव देवदे होते. तर प्रमुख उपस्थिती मध्ये मुदखेड येथील बौद्ध प्रशिक्षण केंद्र येथील पूजनीय भंन्ते पद्मरत्न महाथेरो,पूजनीय भंन्ते शीलरत्न (नांदेड),पूजनीय भंन्ते पयारत्न महाथेरो (विशाखा बुद्ध विहार लेबर कॉलनी नांदेड.)
तसेच माजी सैनिक प्रभाकर घोंगडे, मारुती गुंठे, राजाराम हळदे, देविदास पवार, चंद्रकांत तेलंग, बालाजी गव्हाणे, साहेबराव वने, तसेच सुनील चौदंते आणि देवराव चौदंते यांनी कार्यक्रमाच्या प्रसंगी परिश्रम घेतले.
त्याच प्रमाणे या कार्यक्रमाला विविध पक्षातील पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, महिला पुरुष नवयुवक यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपासक नागोराव लोखंडे सर व मोहन सावते सर यांनी केले.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा