मुदखेड तालुका / प्रतिनिधी
ब्रह्माकुमारी संस्थेच्या पूर्व मुख्य प्रशाशिका व संस्थेच्या पहिल्या ब्रह्माकुमारी मातेश्वरी जगदंबा सरस्वती यांचे ५७ वा स्मृती दिवस ब्रह्माकुमारी उपसेवाकेंद्र मुदखेड येथे श्रद्धांजली अर्पित करण्यात आली.
आज दिनांक २४ जून रोजी प्रजापिता ब्रह्माकुमारी संस्थेच्या पूर्व मुख्य प्रशासिका जगदंबा यांच्या पावन स्मृती दिवसानिमित्त ब्रह्माकुमारीज् मुदखेड येथे मातेश्वरी यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीप लावून श्रद्धांजली अर्पित करण्यात आली.
अनुराधा बहेन आणि श्रुती बहेन यांनी नियोजन केलं. कुमारी ऐश्वर्या व अक्षरा हिने गीत सादर केले.
ब्रह्माकुमारीज् मुदखेड संचालिका पुजा बहेनजी यांनी जगदंबा सरस्वती यांची विशेषता सांगितली. परमपिता परमात्मा शिव ने प्रजापिता ब्रह्मा द्वारे जेव्हा या ज्ञान यज्ञा ची स्थापना केली व त्या यज्ञातून अशा महान विभूती चा अलौकिक जन्म झाला. मात्र वयाच्या १४व्यावर्षात ईश्वरीय अविनाशी रुद्र गीता ज्ञान यज्ञ करत संपूर्ण जीवन परमात्म्याच्या कार्यात अर्पण करून विश्व परिवर्तनाच्या कार्यामध्ये संपूर्ण जीवन समर्पित केलं.
त्यांची वाणी मध्ये मधुरता आणि प्रत्येक बोल हे मनाला शांत करणारे आणि शक्ती संचारित करणारे होते.
संस्थापक प्रजापिता ब्रह्मा बाबांचा निर्देशणांमध्ये राहून मार्गदर्शन या साम्राज्याच्या स्थापनेत ते सतत अग्रेसर होत्या.
आज अश्या विश्व कल्याणी, महादानी, वरदानी, मातेश्वरी जगदंबा यांच्या ५७ व्या स्मृती दिवस निमित्त आपणही त्यांच्यासारखे बनण्याचे दृढ संकल्प करण्याचे आव्हानही ब्रह्माकुमारी पूजा बहेनजी यांनी केले.
यानंतर ब्रह्माकुमारी मुदखेड उपसेवाकेंद्रावरती येणारे राजाराम भाई नकुलवार यांचे सुपुत्र डॉ. मसनाजी राजाराम नुकुलवार यांना अभियांत्रिक या विषयांमध्ये पीएचडी प्राप्त झाल्याबद्दल आणि दहावीच्या परीक्षेमध्ये ८९ टक्के गुण मिळवणारा ज्ञानेश्वर राहेरे यांचाही अध्यात्मिक ज्ञान दिना निमित्ताने सत्कार या कार्यक्रमात करण्यात आला. कार्यक्रमासास
सेवानिवृत्त प्राचार्य राठोड , नायब तहसीलदार बोड्डावार , मनोज कमटे, ग्रामीण जिल्हा सरचिटणीस केतकी ताई चौधरी, ब्रह्माकुमारी केंद्रात दररोज येणारे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा