"राम चौधरी "एक कटू सत्य !

 संपादक आशिष मुगटकर

विशेष लेख

संघर्षमय जीवनातून अमृत महोत्सवी सांगतेचा राजकीय विजनवास "राम चौधरी "एक कटू सत्य !

आज दिनांक व मास दोन्हीही सात याच दिवशी भारतीय स्वातंत्र्यता दिनाच्या आठ दिवस आधी म्हणजे सन एकोणवीसशे सतेचाळीसला स्वातंत्र्यता सेनानी लक्ष्मीकांत चौधरी आणि वत्सलाबाई यांच्या पोटी शिव्हाची निधडी छाती असलेला "राम" जन्मला.अत्यंत हलाकीच्या आर्थिक स्थितीत कसेबसे दहावी पर्यंतचे शिक्षण घेऊन पहिले मलेरिया खात्यात सर्वेची नौकरी यात मन रमले नाही म्हणून जिल्हा परिषदेची शिक्षकी पेषा स्वीकारला,येथेही मन लागत नसल्याने महात्मा गांधी विद्यालयात शिक्षकी पेषा करीत करीत 1985 मध्ये झालेल्या अतिवृष्टीच्या नुकसानीचा घर निहाय्य सर्वे करून पिडितांच्या अडचणी शासन दरबारी मांडून घर-पडलेल्या लोकांना नैसर्गिक आपत्तीची मदत मिळवून देण्यात यशस्वी ठरलेल्या लढ्यातून तयार झालेला आत्मविश्वास यातून तयार झालेले नेतृत्व म्हणजे "राम चौधरी"

तसे हे नाव संपूर्ण मराठवाड्यात सुपरिचित आहे.ते म्हणजे संपूर्ण देशात काँग्रेस पक्षाचा बोल बाला असतांना मुदखेड नगर पालिकेवर  भारतीय जनता पार्टीची एक हाती सत्ता सतत 18 वर्ष टिकवून ठेवण्यात यशस्वी ठरलेल नेतृत्व तसेच नगर पलिकेच्या कोठ्यातून तत्कालीन मराठवाडा विद्यापीठ व विद्यमान डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आधीसभेवर सदस्य म्हणून (शिनेट मेंबर)उत्तुंग अशी कामगिरी करुन संपूर्ण मराठवाडा विभागात शिक्षण क्षेत्रात कर्तृत्वाच्या कौशल्याने नावलौकिक प्राप्त करणारे व्यक्तिमत्व म्हणजे "राम चौधरी"

नगराध्यक्ष असतांना भाजपाच्या मराठावाडा विभागात चळवळीत अग्रनी असलेले तत्कालिन उभरते पण मधल्या काळात भाजपात शिरोधार्य पोहचलेले कालकथित नेतृत्व मा. प्रमोदजी महाजन,मा.गोपीनाथ मुंडे यांना चळवळीस खारीची कुमक देणारे दाते म्हणजे "राम चौधरी "

यांनाच बदलत्या राजकीय परिस्थितीत काहीकाळ स्वकीय राजकारनाची शिकार व्हावी लागणे आणि तेही देशातील सत्ताधारी काँग्रेस पक्षाशी दोन हात करत करत स्वत्व टिकवून ठेवणारे आणि नगर पालिका सत्तेच्या सारिपाठात ब्राम्हण समाजात जन्मघेऊन पुरोगामी महाराष्ट्र धर्म अंगी बाळगून दलित- पिडीत- शोषित- अल्पसंख्यांक समुदायला सोबत घेऊन पुरोगामीत्व सिद्ध करणारे व्यक्तिमत्व अलीकडच्या राजकीय  आर्थिक साम्राज्यवादी वृतीची शिकार ठरली आहे.यांच्या सत्ता काळात अनेक लोकांना उद्योग- व्यापाराच्या संधी निर्माण झाल्या आहेत जसेकी मुदखेड ची जुनी बाजार पेठ गुजरी ते रेल्वे गेट आणि रेल्वे गेट ते रेल्वे स्टेशन या रस्त्या लगत दोन्हीही बाजूने वसलेली बाजारपेठ ही त्याची साक्ष आहे. आजही विळ्यागत वाकलेले पानागत पिकलेले नगर परिषदेत सेवानिवृत्ती नंतर हजारो रुपये निवृत्ती पेन्शन उचलणारे व अनुकंपाखाली वारसा हक्काने सेवेत समाविष्ट झालेले मागास समाजातील शेकडो लोक आमच्यावर राम चौधरी यांचे उपकार आहेत असे सांगतात. केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या प्रशिक्षण केंद्रा करिता शेकडो एकर जमिनी तत्कालीन गृह मंत्री शंकरराव चव्हाण यांनी अधिग्रहण केल्या ते बिचारे शेतकरी आज देशोधडीला लागले. याच वेळी गावास लागून या केंद्राची सुरक्षा भिंत नको अशी अग्रही मागणी लावून धरित काही शेतकऱ्यांना न्याय मिळवून देऊन करडोपती करण्यात ज्यांचे कसब कामी आले ते "राम चौधरी"

राजकारणात संघर्ष करता करता एकुलत्या एक मुलाच्या अकाली जाण्याचे दुःख पचवत - पचवत जगण्याच्या संघर्षालाही या अवलियाने गवसनी घातली तेही एकदा नव्हे तर तीनदा रोड अपघातात मानेचा मनका घसरनेकाय,घाई गडबडीत तोल जाऊन दंत निकामी होने काय आणि श्वासाला त्रास होतो म्हणून ह्रदयस्पर्शी स्पेसमेकर शस्त्रक्रिया होणे काय? या साऱ्या संकटाना रुग्ण शयेवर हसत मुखाने गारद करून माझ्या सारख्या असंख्य कार्यकर्त्यांना सद्याच्या जागतिक महामारीच्या काळात जीवन जगण्याचे आरोग्य विषयक सल्ले देणारा घरचा वैद्य म्हणजे आपला माणूस राम चौधरी.

मागचा मुदखेड विधानसभा मतदार संघ आणि सद्याचा भोकर विधानसभा मतदार संघ या भागाचे आमदार म्हणून नेतृत्व करण्याचे पूर्ण कौशल्य असलेले व्यक्तिमत्व तत्कालीन शिवसेनेच्या लाटेत पक्षनिष्ठ वृत्तीमुळे हरवले की, हेतू पूर्वक संपविण्यात आले हे या भागातील जनतेला न उलघडणारे वास्तव कोडे आहे असेच म्हणावे लागेल. प्रत्येक वेळी मतदार संघा बाहेरील आयात उमेदवार देऊन विद्यमान विधानसभा नेतृत्वास सोईचे होईल असे गृहीतके भाजपा शिवसेनेने तेंव्हा पासून ते आज पर्यंत आखाली यांच्याशी आयुष्यभर संघर्ष करता करता विद्यमान विधानसभा नेतृत्वाशी जुळवून घेण्याचे उसनवारी मनोबलही दाखऊन पहिले खरे!तेथेही कर नाही जुळले. "मित्र म्हणुनी धरिला हात. त्यांनीही केला केला घात.या काव्या प्रमाणे मागच्या विधानसभेचीही निवडणूक लढण्याची इच्छाही मित्रघाता पोटी विरली.असे असले तरी घेतला वसा टाकायचा नाही असे ठरवून कोविड महामारीच्या टाळेबंदित हजारो कुटुंबाला स्वतःची सात/ बारा (शेती )विकून आधार देणारा हा अवलिया. कार्यकर्त्यांवर जीव ओवाळून टाकणारा नेता आयुष्यभर विरोधकांसमवेत स्वकीयांशी संघर्ष करता करता आज अमृत महोत्सवी वर्षाच्या सांगते पर्यन्त पोहचताना अघोषित विजनवास भोगण्याच्या तयारीत आहे. असे असतांना त्यांच्यातील सेवाभाव, कर्तृत्व, नेतृत्व आणि दातृत्व विजनावसातील परीक्षाच ठरेल!यात कोण जिंकतो आणि कोण हरतो हा येणारा काळच ठरवेल हे एक कटू सत्य म्हणजे "राम चौधरी "

संकलन:- नेते प्रवीण शंकरराव गायकवाड

भाजपा मराठवाडा प्रभारी, दि. वि.आ.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

लोकप्रिय बातम्या