प्रा.नारायण शिंदे संधीचे सोने करतील
नांदेड जिल्हा / प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नागरिक संघाच्या राज्य उपाध्यक्षपदी नांदेड येथील यशवंतराव चव्हाण विचार मंचचे अध्यक्ष साहित्यिक प्रा.नारायण शिंदे यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली. या नियुक्तीचे औचित्य साधून त्यांच्या मित्रमंडळाने ज्येष्ठ साहित्यिक डॉ. भगवान अंजनीकर यांच्या अध्यक्षतेखाली प्रा.शिंदे यांचा सत्कार केला. याप्रसंगी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जगदीश कदम,प्रकाशक निर्मलकुमार सूर्यवंशी,दत्ता डांगे,हभप भास्कर शिंदे यांनी मनोगत व्यक्त करून शुभेच्छा दिल्या. प्रा.शिंदे हे उत्तम संघटक असून समाजसेवेचे त्यांना वेड आहे.ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्न ते निश्चितच मार्गी लावतील.आणि संधीचे सोने करतील.अशी अपेक्षा अध्यक्षीय भाषणात डॉ. अंजनीकर यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तसेच आभार प्रदर्शन पंडित पाटील यांनी केले. याप्रसंगी विजयकुमार चित्तरवाड,अनमोलसिंग कामठेकर,शिवाजी देशमुख इ.उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा