नांदेड जिल्हा / प्रतिनिधी
आगामी काळात नांदेड जिल्ह्यातील 10 नगरपालिका, व 1 नगरपंचायत च्या निवडणुका आहेत. यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष हरिहरराव भोसीकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या बैठकीस प्रमुख मार्गदर्शक म्हणून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मराठवाडा संपर्कप्रमुख तथा माजी केंद्रीय मंत्री जयसिंगराव गायकवाड यांची उपस्थिती होती.
आगामी काळात नागरपरिषेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सज्ज राहून पक्षाचे उमेदवार निवडून आणावेत असे आवाहन जयसिंगराव गायकवाड यांनी केले.
यावेळी जिल्हाध्यक्ष हरिहरराव भोसीकर यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करून पक्षाचे अधिकाधिक उमेदवार निवडून आणावे यासाठी आपण स्वतः पूर्णवेळ प्रचार करू,प्रचाराचे योग्य नियोजन करून, सर्व कार्यकर्त्याना सोबत घेऊन निवडणूक लढवू असे सांगितले.प्रचारचे नियोजन याबद्दल सविस्तर माहिती दिली.
या बैठकीस पक्षाचे तालुकाध्यक्ष, शहाराध्य, विधानसभा अध्यक्ष, जिल्हापदाधिकारी उपस्थित होते.यावेळी संबंधित तालुका पदाधिकारी यांचेही मत जाणून घेतले.
याबैठकीस भगवानराव पा. आलेगावकर, रमेश देशमुख शिळवणीकर ,लक्ष्मीकांत पदमवार,प्रा. डी. बी. जांभरूणकर,वसंत सुगावे पाटील,सुभाषराव गायकवाड, भाऊसाहेब देशमुख गोरठेकर,पांडुरंग देशमुख गोरठेकर नागनाथ पा. सावळीकर, संग्राम हायगले, डॉ. विक्रम देशमुख तळेगावकर,अंकुश देशमुख,बालाजीराव शेळके,शिवाजीराव जाधव,धनंजय सूर्यवंशी, सुनील पतंगे,वसंतराव देशमुख,देवराव टिप्परसे,मारोतराव बनसोडे,आनंद गुडमलवार, प्रा. नारायण शिंदे,हणमंतराव जगदंबे,जाविद जब्बोरद्दीन, रवींद्र शेट्टी, शिवानंद शिप्परकर ,संभाजी मुकनर, मोहम्मद बुऱ्हाण, सुधाकरराव जाधव,राजश्री पाटील,आरती चव्हाण, सीमा देशमुख,विश्वनाथ बडूरे,मोहम्मद जानी, जाविद गनी, सरदार खान,उदय देशपांडे, सुभाष रावणगावकर,सुनील मुक्कावार,शेख शादुल होनवडजकर ,जयभीम सोनकांबळे, इरफान खान आदी उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा