असंख्य कार्यकर्त्यांच्या भाऊ गर्दीत नेते प्रवीण गायकवाड यांचा वाढदिवस संपन्न.

 संपादक आशिष मुगटकर



मुदखेड तालुका / प्रतिनिधी

मुदखेड येथील शासकीय विश्राम  गृहात भाजपा दिव्यांग विकास आघाडीचे मराठवाडा प्रभारी नेते प्रवीण गायकवाड यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांच्या हितचिंतकांनी सत्कार समारंभाचे आयोजन केले होते.

यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी जेष्ठ नेते तथा मुदखेड नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष राम चौधरी हे होते. तर प्रमुख उपस्थितीत राष्ट्रीय स्वयंसंघांचे मुदखेड तालुक्याचे कार्यवाहक उत्तम अप्पा चिद्रावार,महात्मा गांधी शिक्षण संस्थेचे सचिव लक्षिमन सोनटक्के, मुख्याध्यापक बा.मो.नाईक, संचालक किरण देशपांडे, जितेंद्र गायकवाड,युसूफ शेठ बागवान,कृषि उत्पन्न बाजार समिती मुदखेड चे सभापती म्हैसाजी भांगे, माजी सभापती भगवान पानेवार,भाजपा जिल्हा सचिव हनुमंत देशमुख,भाजपा ता. अध्यक्ष शंकर मुतकलवाड,वकील संघ तथा विधी आघाडीचे अध्यक्ष ऍड अशोक हामंद,भाजपा ओ.बी.शी.आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष,गुलाब सूर्यवंशी,गोविंद गोपनपल्ले,भाजपा मुदखेड शहराध्यक्ष पुरुषोत्तम चांडक, माजी शहराध्यक्ष संजय सोनटक्के,शिवसेनेचे शहर प्रमुख सचिन चंद्रे यांची होती.

यावेळी कृ.ऊ.बा.स संचालक बालाजी खटिंग,सुरेश शेटे,जयश्री दिलीप देशमुख, रोहिपिंपळगावचे माजी सरपंच शिवाजी शिंदे,वाईचे सरपंच केशव पाटील ढगे,प्रा. दिनेश शेटे, हनुमंत देशमुख, राम चौधरी यांची समायोचित भाषणे झाली.

या वेळी सत्काराला उत्तर देतांना गायकवाड म्हणाले की, माझा पुनःर जन्मवार विश्वास नाही पण माझा पहिला जन्म माझ्या आई वडिलांनी घातला आणि दुसरा जन्म येथे उपस्थित कार्यकर्त्यांनी घातला हे वास्तव सत्य मी कधीच नाकारू शकत नाही, कारण कोरोना सारख्या महामारी काळात कोरोना विषाणू संसर्ग झाल्याने हैद्राबाद, औरंगाबाद आणि नांदेड येथे जो उपचार घ्यावा लागला त्या उपचारासाठी लागलेला लाखोंचा सर्व खर्च माझ्या उपस्थित कार्यकर्त्यांनी उचलला म्हणून माझे कार्यकर्ते माझ्या पुनःर जन्मातले मायबाप आहेत असे मी मानतो असे सांगून निसर्गाचा प्रकोप आणि कोविड सारख्या महामारीतून वाचयाचे असेल तर माझ्यावर प्रेम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांनी शटकोत्तर टिकणाऱ्या झाडांचे वृक्षारोपण करा व रासायनिक शेतीचा वापर कमी करत करत जैविक शेतीकडे वळा असे आवाहन केले.

यावेळी वकील अशोक हामंद ,पत्रकार मनोज कमठे, संचालक मधुकर हौसरे,निळकंठ हामंद, आनंदराव शिंदे,बालाजी गुड्डमवार, सतीश मुंगल,नामदेवराव शिंदे शेख रफिक,दत्ता हामंद,म.कबीर, लक्ष्यूमन मुंगल पाटील, तुळशीराम चुकेवाड, कानोबा बिष्मीले, गजू कमळे, रघुनाथ भालेराव, दिलीप देशमुख, अमोल अडकीने, कालिदास जंगीलवाड,एकनाथ गायकवाड यांच्या सह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महेश देशपांडे, संजय सोनटक्के,सुरेश वाघमारे, प्रभाकर पांचाळ, माधव वाघमारे, प्रमोद हनवटे संदीप लोखंडे आदींनी परिश्रम घेतले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

लोकप्रिय बातम्या