नांदेड जिल्हा / प्रतिनिधी
मुदखेड शहरातील युवा कार्यकर्ते महम्मद साजीद यांचा राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे मुदखेड तालुकाध्यक्ष शिवानंद पाटील शिप्परकर यांच्या नेतृत्वाखाली,राष्ट्रवादी काँग्रेस चे जेष्ठ नेते माजी उपमुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते मा. अजितदादा पवार साहेब यांच्या हस्ते शासकीय विश्रामगृह नांदेड येथे प्रवेश झाला.यावेळी दादा अतिवृष्टी पाहणी दौर्यावर होते.
यावेळी माजी सामाजिक न्याय मंत्री मा.धनंजय मुंडे साहेब, जिल्हाध्यक्ष मा.हरीहरराव भोसीकर साहेब, तालुका सरचिटणीस आशिष कल्याणे मुगटकर,शहराध्यक्ष महम्मद बुराण, सुरज कोदली, संतोष दर्शनवाड, राजेश खंदारे, दिपक सरोदे, बालाजी बळे आदींची उपस्थिती होती.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा