मुदखेड तालुका / प्रतिनिधी
मुदखेड येथे दक्षिण मध्य रेल्वेच्या सुरक्षा अभियानाअंतर्गत आज दिनांक आठ जुन रोजी गेट वर सुरक्षा संबंधी मार्गदर्शन करण्यात आले. या अभियाना मध्ये सहाय्यक मंडळ विद्युत अभियंता रिजवान अंसारी तसेच सुरक्षा प्रचारक सुभाष आवलवार ,शंकर धर्माजी , स्वदेश खंदारे, डी. एम. मीना यांनी मार्गदर्शन केले.
रेल्वे गेट फाटक बंद असताना दुचाकी धारकांनी आपले वाहन खालून काढू नये रेल्वे गेट फाटक वाहनधारकांच्या सुरक्षित साठी निर्माण करण्यात आले आहे. याचा विचार करून वाहनधारकाने रेल्वे फाटक सुरक्षा संबंधी नियमाचे पालन करावे असे आव्हान करण्यात आले.
मेंडका गावात रेल्वे गेट असून या रेल्वेगेट सुरक्षा संबंधी गावकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी ग्रामसभा घेण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच लक्ष्मण ईजळीकर हे होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा