शारदा कॅन्स्ट्रक्शन कंपनीला काळ्या यादीत टाका भाजपाचा नेते प्रवीण गायकवाड यांची मागणी

 संपादक आशिष मुगटकर



मुदखेड तालुका / प्रतिनिधी

दि.२ ,मुदखेड येथील मुदखेड ते उमरी राज्य महामार्गचे काम अत्यंत संथ गतीने होत असल्याने,राज्य महामार्गाने ये-जा करणाऱ्या प्रवास्यांना मोठ्या समस्येचा सामना करावा लागत आहे.या राज्य महा मार्गावरून महाराष्ट्र राज्यातील धर्माबाद, उमरी या दोन तालुक्यातील लोकांना जिल्ह्याशी जोडणारा  हाच मुख्य रस्ता आहे.तसेच शेजारील तेलंगणा राज्यातील जनतेला सोईचा असणारा व महाराष्ट्र राज्यास जोडणारा प्रवाशी मार्ग व सार्वजनिक बांधकाम मंत्री ना.अशोक चव्हाण आणि आ.राजेश पवार माजी आ.बापूसाहेब गोरठेकर अस्या दिग्गज राजकीय लोकांच्या मतदार संघातील प्रमुख राज्य महा मार्ग म्हणून विशेषत्व प्राप्त झालेला राज्य महामार्ग ठेकेदाराच्या गलथान व नियोजन शून्य कारभारामुळे प्रलंबित राहिला आहे. याकडे भाजपा (दि.वि.आ.) चे मराठावाडा विभाग प्रभारी प्रवीण गायकवाड यांनी लक्ष वेधले असून, त्यांनी कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग यांना निवेदन देऊन शारदा कॅन्स्ट्रकशन अशोक नगर नांदेड या बांधकाम ठेकेदार कंपनीस काळ्या यादीत टाकण्याची मागणी केली आहे. या निवेदनात गायकवाड यांनी ठेकेदार यांच्या कडून सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्ता बांधकामा करिता घालून दिलेल्या वेळेचे उल्लंघन करुन,अंदाज पत्रकात नमूद बाबींचा भंग झाल्याचे नमूद केले आहे.तसेच या विलंबा मुळे प्रवाशी मार्गस्थ नागरिकांना सोसावी लागणारी इजा,गैरसोय व या मार्गांवरील उध्वस्त झालेले अनेक व्यावसायिक यास शारदा कॅन्स्ट्रक्शन या कंपनीस जबाबदार धरून काळ्या यादीत टाकण्याची विनंती केली आहे.

या निवेदनाच्या प्रति, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री,ना. अशोक चव्हाण,नांदेडचे खा.प्रताप पाटील चिखलीकर,विधान परिषदेचे आ.रामपाटील रातोळीकर, नायगाव मतदार संघांचे आ. राजेश पवार यांना व्हाट्सअँप प्रणाली द्वारे भ्रमणध्वनीवर निवेदन देऊन लोक प्रतिनिधीचे लक्ष गायकवाड यांनी वेधण्याचा प्रयत्न केला आहे.यावर लोकप्रतिनिधी व शासकीय यंत्रणा काय पवित्रा घेतात की ठेकेदारास पाठीशी घालतात याकडे धर्माबाद -उमरी -मुदखेड तालुक्यातील जनतेचे लक्ष लागून आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

लोकप्रिय बातम्या