नांदेड जिल्हा प्रतिनीधी
अर्धापूर तालुक्यातील देगाव येथील कर्ज बाजारी शेतकरी दिनेश दशरथ जाधव वय 35 यांनी खाजगी तसेच बँकेचे कर्ज कसे फेडावे या धास्तीने 13 डिसेंबर रोजी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
मयत शेतकऱ्याचा भाऊ भारत दशरथ जाधव यांनी बारड पोलीस ठाण्याला दिलेल्या फिर्यादीवरून मयत दिनेश दशरथ जाधव यांनी खाजगी बँकेच्या कर्जाची परतफेड करूनही सातबारा वरील बोजा बँकेचा बोजा कमी करून दिल्या जात नसल्याने चिंतेत होता. सन 2019 मध्ये राधाही इंडिया लिमिटेड शाखा नांदेड
या खाजगी बँकेचे अंदाजे कर्ज एक लाख वीस हजार रुपये काढले होते निसर्ग कोपल्याने दरवर्षी होत असलेल्या नापिकीने आणि वारंवार वेळोवेळी कर्जाचे हप्ते भरूनही सातबारा वरून कर्जाचा बोजा कमी केल्या जात नव्हता या मानसिक तणावाखाली असलेल्या मयत दिनेश दशरथ जाधव या शेतकऱ्याने आपल्या देगावच्या शिवारात असलेल्या माधव नामदेव जाधव यांच्या गोठ्यात टिन पत्राला दोरीने गळफास घेऊन जीवन संपवल्याची हृदय द्रावक घटना घडली आहे.
याप्रकरणी बारड पोलीस ठाण्यात कर्जबाजारी शेतकऱ्याच्या आत्महत्येच्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास बारड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष केंदासे , एन के सिंगरवाड, चक्रधर पवार, शेख अझहर,हे करित आहेत.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा