हदगाव तालुका प्रतिनीधी
हदगाव तालुक्यातील तळणी येथील शिवसेना जिल्हाप्रमुख विवेक देशमुख ,रवी कुमार देशमुख यांचे वडील व अविनाश देशमुख यांचे काका स्व.माधवरावजी किशनराव देशमुख यांचे आज सकाळी अल्पशा आजाराने दुःख निधन झाले.
तळणी व निवघा परिसरात भुसारचे विश्वसनीय व्यापारी म्हणून परिसरातील सर्व गावांमध्ये लोकप्रिय व्यक्तीमत्व होते.
गेले ५-६वर्षापासुन आठवड्यात दोन वेळा डायलिसिस करण्यात येत होते. परंतु मागील १२-१३ दिवसांपासून , त्यांची तब्येत बिघडली होती त्यामुळे त्यांना नांदेड येथील भगवती हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर नातू डॉ अंकुश देवसरकर यांच्याकडे अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. अखेर मृत्यूची झुंज देताना आज दि .२५ रोजी सकाळी त्यांची प्राणज्योत मावळली. त्यामुळे तळणी येथील प्रत्येकाच्या मदतीला धावणारा सर्वांचे काम करणारा, मनमिळाऊ स्वभावाचा, मार्गदर्शन आज त्यांच्यातून निघून गेल्यामुळे तळणी ग्रामस्थांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांचे हे कार्य सदैव सर्वांना स्मरणात राहील... अनेकांवर त्यांनी केलेल्या उपकाराची व स्नेहाची, संख्या मोठी आहे.
देशाईंना भावपूर्ण श्रद्धांजली.
शोकाकुल:-आमदार बाबुराव कदम कोहळीकर समर्थक परिवार हदगाव -हिमायतनगर विधानसभा तथा निवघा -तळणी शिवसेना विभाग प्रमुख सुदर्शन पाटील मनुलकर

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा