मुदखेड तालुका / प्रतिनिधी
यशवंत यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अंतर्गत श्री शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय केंद्र क्रमांक ८५१७५ या ठिकाणी आज दि.४ रोजी सकाळी ११:३० मिनिटांनी ABC आयडी समंत्रनसत्राच्या शिबिराचे आयोजन केले होते याप्रसंगी श्री शिवाजी कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य हेमंत इंगळे सर हे अध्यक्ष स्थान होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्राध्यापक डॉक्टर पंजाबराव शिंदे हे होते याप्रसंगी प्रा शिंदे यांनी ABC आयडी कशी काढायची? त्याचे महत्त्व काय?याबद्दल सविस्तर विवेचन केले व येत्या रविवारपासून प्रत्येक रविवारी समंत्रणाचे तासाचे नेहमी प्रमाणे आयोजन केल्या जातील त्याचे वेळापत्रक लवकरच अभ्यास केंद्रात व आपल्या ग्रुप वर उपलब्ध होईल याबद्दलही सविस्तर माहिती देण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात श्री हेमंत इंगळे यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० व शिक्षणात झालेले बदल याबद्दल विद्यार्थ्यांना माहिती दिली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक कैलास खानसोळे सर यांनी केली तर आभार प्रदर्शन प्राध्यापक कपाटे सर यांनी केली या प्रसंगी मोठ्या प्रमाणामध्ये विद्यार्थी सहभागी झाले होते

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा