मुदखेड दि.१९
येथील बारड, पांढरवाडी, पाटनूर शिवारात दि १६ मार्च रोजी आलेल्या असमानी संकटात सापडलेल्या गारपिटग्रस्त बळीराज्याचे दुःख वाटून घेण्यासाठी राज्याचे ग्रामीण विकास मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.गिरीष महाजन यांनी प्रत्यक्ष नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन बाधित पिकांची पाहणी करत शेतकरी बांधवांच्या व्यथा थेट बांधवर जाऊन समजून घेतल्या आणि सर्व निकष बाजूला ठेऊन शेतकऱ्यांचे समाधान होईल इतकी मदत लवकरात लवकर केल्या जाईल असे अश्वस्त केले आहे. राज्याच्या राजकीय,सामाजिक, सैक्षणिक,धार्मिक आणि नैसर्गिक आपत्ती कमी ज्यांची भाजपा नेतृत्वात संकट मोचक म्हणून ख्याती आहे. अश्या कर्तव्य दक्ष ग्रामीण विकास तथा पालकमंत्री ना.गिरीष महाजन यांच्या भेटीने मुदखेड तालुक्यातील संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या आशा प्रफुलीत झाल्या असून राज्य भाजपाचे संकटत मोचक मुदखेड तालुक्यातील गारपीठ ग्रस्त शेतकऱ्यांची अडचण नक्कीच दूर करतील असा विश्वास शेतकरी बांधवानी व्यक्त केला आहे.
या वेळी ना.गिरीष महाजन यांच्या सोबत आ.राम पाटील रातोळीकर,आ.बालाजी कल्याणकर,आ.राजेश पवार,जिल्हाधिकारी अभीजीत राऊत, जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर, पोलीस अधीक्षक यांच्या सह नांदेड जिल्ह्यातील सर्वच विभागाचे प्रमुख आणि मुदखेड चे तहसीलदार सुजित नरहिरे, गटविकास अधिकारी बळदे, कृषि अधिकारी पुरी तसेच भाजपा वैद्यकीय आघाडीचे संयोजक डॉ. अजित गोपछडे,भाजपा महानगर अध्यक्ष प्रवीण साले,सरचिटणीस विजय गंबीरे,भाजपा मराठवाडा प्रभारी(दि.वि.आ )प्रवीण गायकवाड,भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष व्यंकटेश साठे, भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष ऍड.किशोर देशमुख,भाजपा ओ.बी.शी.मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष गोविंद गोपनपल्ले,भाजपा ता. अध्यक्ष शंकर मुतकलवाड,कृ.ऊ.बा.स. मुदखेडचे सभापती मैसाजी भांगे,भाजपा मुदखेड शहराध्यक्ष पुरुषोत्तम चांडक, भाजपा युवा मोर्चा जिल्हा सचिव विलास कल्याने आदी भाजपाचे नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने मंत्री मोहदयांच्या ताफ्यात सहभागी झाले होते. हा संपूर्ण दौर्यात बाधित शेतकऱ्यांची संपूर्ण माहिती मंत्री मोहदयांना भाजपा किसान मोर्चाचे दिगंबर टिप्परसे, संचालक बालाजी खटिंग,गोविंद चित्तलवाड,ओबीसी मोर्चाचे कैलाश आमदूरकर यांनी दौऱ्याच्या शेवट पर्यंत दिली. या बद्दल शेतकरी बांधवांकडून विश्वासक दिलासा मिळाल्याची भावना व्यक्त केल्या जात होती.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा