मुदखेड तालुका / प्रतिनिधी
मुदखेड तालुक्यातील बहुतांश भागात दि.१६ मार्च रोजी झालेल्या वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील पिकाचे अतोनात नुकसान झाले असून तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे पालकमंत्री गिरीश महाजन यांना करण्यात आली.
मुदखेड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामध्ये केळी, हरभरा, गहू, ज्वारी, टरबूज, पपई अशा रब्बी व बागायती पिकांचे १००% नुकसान झाल्यामुळे शेतकरी हवालदील झाला आहे. आधिच कोरोना-१९ मुळे हैराण झालेला शेतकरी कसाबसा सदरील पिकांची लागवड करुन आपल्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह करीत होता. परंतु अचानक झालेल्या गारपिटीमुळे त्याचे हातास आलेल्या पिकाचे १००% नुकसान झाल्यामुळे संपूर्ण शेतकरी वर्ग हैराण झाला आहे.
सर्व बाबींचा यथोचित गांभीर्याने विचार करुन शेतकऱ्यांच्या झालेल्या पिकाची नुकसान भरपाई शासन स्तरावर तात्काळ मिळवून देऊन शेतकऱ्यास दिलासा द्यावा अशी मागणी भाजप किसान मोर्चाचे सरचिटणीस भगवान पाटील पुयड नागेलीकर यांनी केली.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा