मुदखेड तालुका / प्रतिनिधी
मुदखेड शहरातील राजीव गांधी महाविद्यालय दि.८रोजी जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रमेश कदम तर प्रमुख पाहुणे म्हणून जनता कनिष्ठ महाविद्यालय नायगाव येथील प्रा. सौ. राजेश्वरी कदम , कै. वसंतराव काळे वरिष्ठ महाविद्यालय नांदेड येथील अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. स्मिता कोंडेवार , महाराष्ट्र ग्रामीण बँकेतील सहाय्यक अधिकारी मुक्ता बोराडे ,कोमल मेश्राम हे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. वानखेडे सविता यांनी केले , प्रा. डॉ. मंजुषा कोल्हे, कांबळे संयोगिता, प्रा. डॉ. सावते विद्या ,नंदा करंजकर, अश्विनी पेरेवार , सुलोचना माळवे, प्रा. डॉ. आर . बी. कोटलवार यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पुढाकार घेतला.
महाविद्यालयीन कर्तुत्ववान महिलांचा सन्मान कार्यक्रमाला बहुसंख्य विद्यार्थी , विद्यार्थिनी प्राध्यापक शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा