यशवंतरावजी चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त मा. मा. जाधव यांचा सत्कार संपन्न.

 संपादक आशिष मुगटकर



नांदेड जिल्हा / प्रतिनिधी 

यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त यशवंतराव चव्हाण विचार मंचच्या वतीने आयोजित कार्यक्रमात डॉ मा.मा.जाधव यांचा स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड च्या मराठी अभ्यास मंडळावर दुसऱ्यांदा अध्यक्ष म्हणून निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.या सत्कार सोहळ्याचे अध्यक्ष जेष्ठ साहित्यिक जगदीश कदम तर प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य बापूसाहेब काळबांडे हे उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला यशवंतरावजी चव्हाण यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पुजन करण्यात आले.



डॉ मा. मा.जाधव यांचा मंचच्या वतीने सन्मानपत्र,फेटा,शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यानंतर. सन्मानपत्राचे वाचन नरेंद्र नाईक यांनी केले. प्रमुख पाहुणे प्राचार्य बापूसाहेब काळबांडे यांनी मा.मा.जाधव यांच्या कार्याचा आढावा घेतला. त्यानंतर मा.मा.जाधव.सत्काराला उत्तर देताना असे म्हणाले, ज्या यशवंतराव चव्हाण यांनी मराठी भाषा संवर्धनासाठी सर्वाधिक प्रयत्न केले.म्हणून त्यांच्या नावाने चालणाऱ्या विचारमंचच्यावतीने माझा सत्कार करण्यात आला,त्याचा मला खूप मोठा आनंद वाटतो. ते पुढे असे म्हणाले, बदलत्या शिक्षण धोरणांत अभ्यासक्रम तयार करताना सर्वसमावेशक व बदलते उदिष्ट पूर्ण करणारा अभ्यासक्रम तयार केला जाईल. त्यांनी सत्कारा बदल मंचाचे अध्यक्ष नारायण शिंदे व त्यांचे सहकारी यांचे आभार मानले.

अध्यक्षीय समारोप करताना डॉ. जगदीश कदम म्हणाले की, मा.मा.जाधव हे परिवर्तनवादी विचारांचा प्रभाव असलेले व्यक्तिमत्व आहे. ते आतापर्यंत एक भूमिका घेवून जगले. त्यांनी अक्षरगाथा हे त्रैमासिक चालवताना व विवेक जागरच्या माध्यमातून जाधव सरांनी आव्हानात्मक विषयावर घेऊन चर्चा घडवून आणली, असे गौरवोद्गार काढले. यावेळी डॉ. संजय जगताप यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा. डॉ. व्यंकटी पावडे यांनी केले. तर आभार अनमोलसिंघ कामठेकर यांनी मानले.

यावेळी निर्मलकुमार सूर्यवंशी, राउतखेडकर, रामेश्वर शिंदे,अनंत पुपलवाड, विजयकुमार बेंबडे,प्रा.कमलाकर चव्हाण, डॉ. भारत कचरे, संदीपराव देशमुख, अर्जुन शिंदे आदी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

लोकप्रिय बातम्या