राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदाची माळ शिवानंद शिप्परकर यांच्या गळ्यात .

 संपादक आशिष मुगटकर


मुदखेड /तालुका प्रतिनिधी

मुदखेड तालुक्यातील  राष्ट्रवादी युवा काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष शिवानंद दिगंबर शिप्परकर यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मुदखेड च्या तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली. 

गुरुवारी दि.२४ रोजी नांदेड येथील शासकीय विश्रामगृहात झालेल्या एका बैठकीत तालुकाध्यक्ष पदाच्या निवडीचे पत्र. राष्ट्रवादी काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष हरिहर भोसीकर यांच्या हस्ते देण्यात आले.  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नांदेड जिल्हाध्यक्ष हरिहर भोसीकर यांनी मुदखेड तालुकाध्यक्षपदी शिवानंद शिप्परकर यांची निवड सर्वानुमते केली. 

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मुदखेड तालुकाध्यक्षपदी त्यांची निवड झाल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस वसंत सुगावे, महिला जिल्हा अध्यक्षा प्रांजलीताई रावणगावकर, जिल्हा सरचिटणीस जांभरुनकर, भाऊसाहेब गोरठेकर, जिल्हा उपाध्यक्ष पांडुरंग देशमुख गोरठेकर, विद्यार्थी जिल्हाध्यक्ष श्रीकांत मांजरमकर, जिल्हा कार्याध्यक्ष अँड सचिन जाधव, बाळासाहेब भोसीकर, जिल्हा सरचिटणीस सचिन देशमुख, गोविंद खटिंग यशोदीप पाटील, शिवाजी पवार, संदीप पवार, ओमकार देशमुख बारडकर, महंमद बुराण,शेख सादिक, माधव व्यवहारे, मुंजाजी गव्हाणे, गोविंदराव मुंगल, प्रशांत मुंगल, आशिष कल्याणे मुगटकर, मोहम्मद अली, विठ्ठल गोवंदे, शंकर खवास यांच्यासह अनेकांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

लोकप्रिय बातम्या