मुदखेड / शहर प्रतिनिधि / अतीक अहमद
दि.२१जून रोजी मुदखेड येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने इंधन दरवाढीच्या विरोधात तहसीलदारांना निवेदन देण्यात आले आहे.
मागील दिड वर्षांपासून गोरगरीब जनता कोरोना सारख्या गंभीर आजाराशी लढत असून,त्यातच केंद्र सरकार व राज्य सरकारने जीवनावश्यक वस्तुचे व तसेच पेट्रोल आणि डिझलचे दर वाढवून आगीत तेल ओतण्याचे काम केले आहे.
इंधनाचे दर वाढल्यामुळे सर्व वस्तुचे दर आपोआप वाढत आसतात कारण व्यापारी हे दळणवळणाचा खर्च वस्तुचे दर वाढवून वसूल करीत असतात,त्यामुळे दैनंदिन जिवनात आवश्यक असलेल्या वस्तुच्या किमती वाढल्यामुळे सामान्य जनता हि या महागाईच्या भडक्यामध्ये होरपळून निघत आहे.यामध्ये खाद्य तेलाचा भाव दाळीचे ,भाव असे जिवनावश्यक वस्तुचे भाव गगनाला भिडले असुन, गोरगरीब जनता खायचे काय आणि कमवायचे काय असा प्रश्न जनते समोर पडला आहे.यासाठी दरवाढीला आळा घालण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या विरोधात इंधन दरवाढीच्या धोरणाचा जाहीर निषेध व्यक्त केला आहे.
केंद्र सरकारने व राज्य सरकारने इंधन दरवाढी कमी करण्यात यावी असे निवेदन तहसील कार्यालयात खानसोळे यांना देण्यात आले आहे. या वेळी निवेदनकर्ते बालाजी सुर्यतळे सभापती पं.स.मुदखेड,मोहनराव कांबळे,डि.जी.चौदंते, गंगाधर पा.पवार, शिवानंद देवके,ओमकार चव्हाण, राहुल अप्पा चौदंते, सिध्दार्थ चौदंते,स्वप्नील वाघमारे, स्वप्नील कांबळे, निखिल चौदंते,सोहन कांबळे, अमोल चौदंते,रवी सावते,ईत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा