मुगट / प्रतिनिधी
दि.२१ रोजी मुगट येथील माध्यमिक आश्रम शाळेच्या प्रांगणात जागतिक आरोग्य दिन आर्ट ऑफ लिव्हिंग च्या परिवारातील सदस्यांनी एकत्र येऊन साजरा केला.
आश्रम शाळेच्या प्रांगणात मुगट गावचे ग्राम विकास अधिकारी तथा योग प्रशिक्षक राजेश्वर भुरे यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.सर्व प्रथम श्री. श्री.श्री. रविशंकरजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन आर्ट ऑफ लिव्हिंग परिवारातील उपस्थित साधकांच्या हस्ते करण्यात आले. नागोराव शेलगावकर यांच्या सहकार्याने योगासनाचे प्रात्यक्षीक व महत्त्व उपस्थित साधकांना सांगण्यात आले. उपस्थितीत साधकांनी सुद्धा योगासने, प्राणायाम केला . यावेळी जागतिक योग दिवस आनंदात व उत्साहात साजरा केला.
यावेळी तंटामुक्ती अध्यक्ष माधवराव कल्याणे, दुधडेरी चेअरमन रेशमाची कल्याणे, खंडू पवार, डॉ.विनायक खेडवनकर, गुणाजी पवार, माधवराव कल्याणे, विजय वाकडे,लक्ष्मण कल्याणे यांची उपस्थिती होती.
जागतिक योग दिन साजरा करण्यासाठी साधक अनिल कुलकर्णी व सहकार्याने यावेळी परिश्रम घेतले


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा