केंद्रीय प्रशिक्षण संस्था केंद्रीय रिजर्व पुलिस बल मुदखेड येथे वृक्षारोपण संपन्न





मुदखेड/ शहर प्रतिनिधी /अतीक अहेमद

शहरामध्ये असलेले केंद्रीय प्रशिक्षण संस्थान केंद्रीय रिजर्व पुलिस बल मुदखेड येथे वृक्षारोपण अभियान अतर्गत संस्थेच्या परिसरामध्ये ५००० पाच हजार रोपटे लागवड हे लक्ष्य केंद्रित करत आणि पावसाळा सत्राच्या माध्यमातुन आज दिनांक १९ जून २०२१ रोजी केंद्रीय प्रशिक्षण महाविद्यालय केंद्रीय रिझर्व्ह  पोलीस बलाचे कमांडेंट के के पांडे आणि क्षेत्रीय कुटुंब कल्याण समूहाची अध्यक्षा श्रीमती अंजू पांडे यांनी एक एक रोपट लावले संस्थेचे कमांडंट केके पांडे यांनी वृक्षारोपणाच्या महत्त्वावर प्रकाश टाकताना सांगितले की आपल्या पर्यावरणाला हिरवेगार बनवण्यासाठी आम्हास प्रत्येक वर्षी वृक्षारोपण केलं पाहिजे आणि येणाऱ्या पिढीतील मुलांना सुद्धा पर्यावरणाला संरक्षण आणि जागरूक व संवेदिनशील केले पाहिजे प्रत्येक व्यक्ती तिथून वचन घेतलं पाहिजे की पर्यावरण संरक्षण आणि समृद्ध करण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे शास्त्रामध्ये असे उल्लेखित केले आहे की एक वृक्ष लागवड म्हणजे दहा पुत्रांच्या  समतुल्य आहे आमच्या जीवनामध्ये प्रत्येकाला चांगलं व दर्जेदार जीवन पाहिजे ज्या प्रमाणे आपण आपल्या मुलांचा ज्याप्रमाणे संगोपन करतो त्याप्रमाणे एक रोपट्याचा संरक्षण व पालन-पोषण करणे आवश्यक असल्याचे सांगितले कारण शुद्ध हवा आणि ऑक्सिजन च्या शिवाय मानवाचं जीवन अशक्य असल्याचे पुढे सांगितले.


यावेळी कॅम्पस  परिसरातील सर्व अधिकारी,अधीनस्थ अधिकारी व जवान आणि त्यांचे कुटुंबाच्या सदस्यानी लिंब, करंज लिंब ,काशिद, गुलमोहर आणि अमलतास इत्यादी प्रकारचे जवळपास सातशे रोपट्यांची लागवड केली प्रत्येक रोपट्यांची चांगल्या प्रकारे देखरेख करणे यामागचा हेतू असून आणि प्रत्येकाची जबाबदारी आहे की प्रत्येक अधिकारी,  अधीनस्थ अधिकारी आणि जवानांना  जबाबदारी दिली गेली याच्या व्यतिरिक्त जवानांच्या निवास परिसरात रोपट्यांचा लागवड केली गेली त्या सर्व  कुटुंबांतील प्रत्येक व्यक्तीने आपली नैतिक जबाबदारी लक्षात घेऊन प्रत्येक रोपट्यांची चांगल्या प्रकारे देखरेख केली पाहिजे .

या वेळी संस्थेचे सी एम ओ (एस जी) डॉ . डी के मिश्रा, उप कमांडंट पुरुषोत्तम जोशी कपिल बेनिवाल, सहायक उप कमांडंट पुरुषोत्तम राजगडकर रुपेश कुमार केंद्रीय प्रशिक्षण महाविद्यालय च्या परिसरात  मुदखेड पत्रकार संघ च्या वतीने वृक्ष लागवड करण्यात आले  जिल्हा पत्रकार संघाचे चे जिल्हा सचिव संजय कोलते, नामदेव बिचेवार, अतीक अहेमद,अमोल टेकले, शेख इरफान, सिध्दार्थ चौंदते, अब्दूक रज्जाक आणि आदित्य कोलते सहित सर्व अधिनस्थ अधिकारी , जवान आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्य उपस्थित होते .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

लोकप्रिय बातम्या