राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस मुदखेड तालुकाध्यक्ष पदी प्रशांत कल्याणे यांची नियुक्ती..

 संपादक आशिष मुगटकर


मुदखेड/ तालुका प्रतिनिधी

.नांदेड जिल्हा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस ग्रामीणच्या  मुदखेड तालुकाध्यक्ष पदी प्रशांत कल्याणे यांची नियुक्ती करण्यात आली असून या निवडीबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.

राष्ट्रीय अध्यक्ष  शरदचंद्रजी पवार  प्रदेश अध्यक्ष. जयंत पाटील  माजी मंत्री व ज्येष्ठ नेते कमलकिशोर कदम , राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिलदादा गव्हाणे, राष्ट्रवादी काँग्रेस पाटीचे जिल्हाध्यक्ष हरिहरराव भोसीकर  यांना अभिप्रित असणारी संघटना बांधण्यासाठी आपण प्रयत्नशील राहाल,पक्ष बळकटी करण्यासाठी व मजबूत करण्यासाठी पक्षाची ध्येय धोरणे सर्वसामान्यांपर्यंत

पोहोचविण्यासाठी  सहकार्य  करावे असे  नियुक्ती पत्रात  राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस चे  जिल्हाध्यक्ष श्रीकांत मांजरकर यांनी एका नियुक्ती पत्रा व्दारे नियुक्ती  केले  यावेळी जिल्हा सरचिटणीस जांभरूणकर सर,बाळासाहेब भोसीकर,शिवानंद पाटील शिप्परकर, आशिष कल्याणे,सतीष कल्याणे,अनुप राऊत,वैभव गंगातीर,अनिरूद्ध सुर्यवंशी,विष्णू पाटील आदी उपस्थित होते या निवडीबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

लोकप्रिय बातम्या