नांदेड जिल्हा कृषी अधीक्षक श्री.चलवदे यांची भेट घेऊन केली मागणी.
नांदेड/ जिल्हा प्रतिनिधी
जिल्ह्यातील शेतकरी खरीब हंगामाची पेरणीला सुरूवात झाली आहे.शेतकरी बाजरात बी-बियाणे व रासायनिक खतांच्या खरेदी साठी मोठ्या प्रमाणात येत आहे पण व्यापारी आपली मनमानी करताना दिसुन येत आहे. सोयाबीनचे बियाणे वाढीव किंमतीत देत आहेत. चांगल्या कंपनी ऐवजी स्थानिक कंपनीच्या दर्जाहीन बियाणे शेतकऱ्यांना देत आहेत. रासायनिक खताचे लिंकिंग करत आहेत व वाढीव किमतीत खते विक्री करत आहेत . ही शेतकऱ्यांची भर दिवसा होणारी ही लूट होत आहे.
आपण यावर काही कार्यवाही करणार की नाही ?? असा जवाब कृषी अधीक्षक यांना केला व या संबंधिचे लेखी निवेदन देण्यात आले.
यावेळी रयत क्रांती संघटनेचे जिल्हा अध्यक्ष विनोद वंजारे, बालाजी पांचाळ,आनंद लोंढे,शंकर सावळे उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा