मुदखेड सरपंच संघटनेचे लेखी निवेदन
मुदखेड /शहर प्रतिनिधि/ अतीक अहमद
मुदखेड पंचायत समितीस कायमस्वरूपी गटविकास अधिकारी मिळत नसल्याने तसेच पंचायत समितीचा कारभार एकाच विस्तार अधिकाऱ्यांवर सुरु असल्याने ग्रामपंचायत अंतर्गत अडीअडचणी सोडविण्यासाठी नागरिकांना चकरा माराव्या लागत असल्याने दोन्ही पदे भरण्याची मागणीचे लेखी निवेदन सरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष कैलास पाटील पाथरडकर यांनी जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले आहे.
मुदखेड पंचायत समितीचा कारभार गेल्या अनेक दिवसांपासून प्रभारिच सांभाळत आहेत . याशिवाय पंचायत समिती अंतर्गत जिल्हा परिषद गट दोन असून एकूण ५१ गावांचा समावेश आहे. परंतु दोन्ही गटाचा कारभार एकाच विस्तार अधिकाऱ्यावर सुरू असल्याने ग्रामपंचायत च्या लोक सेवकांना तसेच नागरिकांना पंचायत समिती अंतर्गत कामे सोडविण्यासाठी चकरा माराव्या लागत असल्याचे निवेदनात नमूद केले आहे. कोरोना महामारी मुळे पंधराव्या वित्त आयोग तसेच पंचायत समिती अंतर्गत अनेक विकास कामे खोळंबली असल्याचे सरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष कैलास पाटील पाथरडकर यांनी म्हटले आहे.
ग्रामपंचायत अंतर्गत गाव पातळीवरील छोट्या मोठ्या कामांसाठी दररोज पंचायत समिती जावे लागते परंतु कायमस्वरूपी गटविकास अधिकारी नसल्याने तसेच एकाच विस्तार अधिकाऱ्यावर कारभार सुरू असल्याने अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.
पंचायत समिती अंतर्गत कायमस्वरूपी गटविकास अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याची मागणी सरपंच संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. यासोबत जिल्हा परिषद गट दोन असून चार पंचायत समिती गणासाठी एकच विस्तार अधिकारी असल्याचे निवेदनात नमूद केले आहे. दोन्ही गटासाठी विभक्त विस्तार अधिकारी नियुक्त करण्याची मागणी करण्यात आली आहे. याबाबत चे निवेदन सरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष कैलास पाटील पाथरडकर यांनी जिल्हाधिकारी तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी नांदेड यांच्याकडे दिली आहे.
ग्रामपंचायत अंतर्गत गाव पातळीवरील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी लोक सेवकांना दररोज पंचायत समितीस जावे लागते परंतु कायमस्वरूपी गटविकास अधिकारी नसल्याने तसेच एकाच विस्तार अधिकार्यावर कारभार सुरू असल्याने पंचायत समिती अंतर्गत कामास विलंब लागत आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा